Dharmendra-Shabana Azmi Kissing Scene esakal
मनोरंजन

Shabana Azmi On Kissing Scene: धर्मेंद्र यांना किस करायला कुणाला आवडणार नाही? शबाना आझमी बोलून गेल्या!

Vaishali Patil

Dharmendra-Shabana Azmi Kissing Scene: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर चार दिवसांत रॉकी आणि राणीने 51 कोटींची कमाई केली आहे.

करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटातील रॉकी अन् राणीची केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडली. मात्र चित्रपटाचं नाव जरी रॉकी और राणी की प्रेम कहानी असलं तरी या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसींग सीननं धुराळाच उडवला.

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि धर्मेंद्र लिप लॉक करताना दिसत आहेत. त्याच्या या सीनची सध्या सोशल मिडियाबरोबरच मनोरंजन विश्वातही खुप चर्चा आहे. या सीनचे बरेच व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. अनेकांनी या सीनवर टिका देखील केली. आता यावर शबाना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किसिंग सीनबद्दल शबाना म्हणतात की, “मला मुळीच वाटलं नव्हतं की या सीनमुळे इतका गोंधळ होईल. जेव्हा किसींग सीन मोठ्या पडद्यावर दाखवला जातो तेव्हा लोक खुश होतात. हा सीन पाहताना प्रेक्षक इमोशनल होतात. पण शूटिंगच्या वेळी अशी काही समस्या आली नाही. मी याआधी मोठ्या पडद्यावर जास्त किसिंग सीन दिलेले नाहीत हे नक्कीच! मात्र धर्मेंद्रसारख्या देखण्या माणसाला किस करायला कोणाला आवडणार नाही."

इतकच नाही तर शबाना आझमींचे पती जावेद अख्तर यांचा या किसींग सीनवर काही आक्षेप नव्हता. आम्ही थिएटरमध्ये एकत्र हा सिनेमा पाहिला आणि त्यांना खुप मजाही आली.

87 वयाचे धर्मेंद्र आणि 77 वर्षाच्या शबाना आझमी यांचा या वयात किसींग सीन का दाखवला? उगाच चित्रपट हिट होण्यासाठी करणने काहीही दाखवतो अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्हायरल झाल्या.

हा एक सीन नाही तर दोघांचे अनेक बोल्ड सीन या चित्रपटात आहेत. आता या सीनवर शबाना आझमी यांनी दिलेलं बोल्ड स्टेटमेंट सध्या चर्चेत आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT