Shabana Azmi And Kangana Ranaut esakal
मनोरंजन

शबाना आझमींनी कंगनाला झापलं !

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत ही ट्विटर वर खूप ऍक्टिव्ह असते आणि नेहमी वादग्रस्त विधान करण्यासाठी ओळखली जाते.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकातील हिजाब (Hijab) प्रकरणावर अभिनेत्री कंगनाने (Kangana Ranaut) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत लिहिले की "मुक्त होऊन जगायला शिका,स्वतःला पिंजऱ्यात ठेवू नका. हिम्मत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानमध्ये हिजाब न घालता वावरून दाखवा." कंगनाच्या या विधानावर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी भारत धर्मनिरपेक्ष आहे याची आठवण करून देत तिला प्रत्युत्तर दिलं आहे. "मी चुकत असेन तर मला सुधारा पण अफगाणिस्तान हा ईश्वरशासित (Theocratic) देश आहे.आणि जिथपर्यंत मला आठवते भारत हा एक धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक (Secular Democratic Republic) देश आहे." असे म्हणत त्यांनी कंगनाच्या मताचे खंडन केले आहे.

कर्नाटकमध्ये उडपीमधील एका महाविद्यालयात सहा विद्यार्थिनींना हिजाब घातला म्हणून प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्या विद्यार्थिनींना शिक्षणा विभागात तक्रार केली. पण, मुलींनी महाविद्यालयीन गणवेशातच यावं, असं सांगण्यात आलं. त्यानंतर मुलींनी न्यायालयात धाव घेतली. मुली जर हिजाब घालून महाविद्यालयात आल्या, तर हिंदूत्ववादी विद्यार्थी भगवे शेले घेऊन येतील, अशी भूमिका काही हिंदूत्ववादी संघटनांनी घेतली आहे. त्यानंतर हा वाद आणखीच चिघळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : पश्चिम आशियातील संकटामुळे एप्रिल-जून दरम्यान इंधन विक्रीतून तेल कंपन्यांचे सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले: हरदीप पुरी

SCROLL FOR NEXT