Shabana Azmi warns against phishing attempts under her name, to lodge police complaint SAKAL
मनोरंजन

Shabana Azmi: शबाना आझमींच्या नावावर झाली ऑनलाईन फसवणुक, अभिनेत्रीची पोलिसात तक्रार

नावाचा गैरवापर करत फिशिंग होत असल्याने शबाना यांनी सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

Devendra Jadhav

बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमींसोबत एक धक्कादायक गोष्ट घडलीय. शबाना आझमींच्या नावाने ऑनलाईन फसवणुक होत असल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस आलीय.

शबाना आझमींनी ट्विटरवर याविषयी खुलासा करत म्हटलं की, माझं नाव वापरुन ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. नावाचा गैरवापर करत फिशिंग होत असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शबाना आझमींनी पुढे खुलासा केला की, त्यांच्या नावाचा गैरवापर करुन लूटमार करण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यांच्या नावाने येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये. यासोबतच अभिनेत्रीच्या वतीने पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

याबाबत शबाना आझमी यांनी मंगळवारी ट्विटरवर पोस्ट केली. त्या म्हणतात म्हणाले, "माझ्या नावाने काही मेसेज माझ्या सहकाऱ्यांना आणि कुटुंबियांना पाठवले जात असल्याचे आमच्या नुकतेच लक्षात आले आहे. हे स्पष्टपणे फिशिंग आहे. कृपया अशा मेसेज आणि कॉलवर क्लिक करू नका किंवा कोणतेही उत्तर देऊ नका. आम्ही पोलिसांत तक्रार दिली आहे. +66987577041 आणि +998917811675 या क्रमांकावरून असे संदेश पाठवले जात आहेत."

शबाना आणि धर्मेंद्र यांचा किसिंग सीन

अलीकडेच रिलीज झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात शबाना आणि धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनची चर्चा झाली. त्या किसिंग सीनबद्दल शबाना म्हणतात की, “मला मुळीच वाटलं नव्हतं की या सीनमुळे इतका गोंधळ होईल. जेव्हा किसींग सीन मोठ्या पडद्यावर दाखवला जातो तेव्हा लोक खुश होतात. हा सीन पाहताना प्रेक्षक इमोशनल होतात. पण शूटिंगच्या वेळी अशी काही समस्या आली नाही. मी याआधी मोठ्या पडद्यावर जास्त किसिंग सीन दिलेले नाहीत हे नक्कीच! मात्र धर्मेंद्रसारख्या देखण्या माणसाला किस करायला कोणाला आवडणार नाही."

इतकच नाही तर शबाना आझमींचे पती जावेद अख्तर यांचा या किसींग सीनवर काही आक्षेप नव्हता. आम्ही थिएटरमध्ये एकत्र हा सिनेमा पाहिला आणि त्यांना खुप मजाही आली.

87 वयाचे धर्मेंद्र आणि 77 वर्षाच्या शबाना आझमी यांचा या वयात किसींग सीन का दाखवला? उगाच चित्रपट हिट होण्यासाठी करणने काहीही दाखवतो अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्हायरल झाल्या.

हा एक सीन नाही तर दोघांचे अनेक बोल्ड सीन या चित्रपटात आहेत. आता या सीनवर शबाना आझमी यांनी दिलेलं बोल्ड स्टेटमेंट सध्या चर्चेत आलं आहे. परंतु शबाना या बिनधास्तपणे लोकांच्या प्रतिक्रियांना सामोऱ्या गेल्या. नुकताच १८ ऑगस्टला शबाना यांचा घूमर सिनेमा सगळीकडे रिलीज झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT