Saira Banu comment on shah rukh khan  esakal
मनोरंजन

Saira Banu : 'मला मुलगा असता तर तो....'! सायरा बानो शाहरुखला शुभेच्छा देताना झाल्या भावूक

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शाहरुखचं कौतुक केलं आहे. त्याचं अभिष्टचिंतन करुन त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

युगंधर ताजणे

Saira Banu shares birthday wishes for shah rukh khan : किंग खान शाहरुखचा आज ५८ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्तानं त्याला लाखो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. जगाच्या पाठीवर सर्वाधिक फॅन्स असणारा अभिनेता सेलिब्रेटी म्हणून शाहरुखचे नाव घ्यावे लागेल. अशात त्यानं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शाहरुखचं कौतुक केलं आहे. त्याचं अभिष्टचिंतन करुन त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. या सगळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनय आणि सौंदर्यानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले.

मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

सोशल मीडियावर शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्याप्रती व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. मराठी सेलिब्रेटींनी देखील शाहरुखप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर त्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. सायराजींनी इंस्टावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात त्यांनी शाहरुखसोबत फोटो शेयर केला आहे.

सायराजींनी त्यावर लिहिलं आहे की, प्रिय शाहरुख मी यापूर्वी देखील अनेकदा बोलली आहे आणि पुन्हा एकदा सांगते, मला तर मुलगा असता तर तो अगदी तुझ्यासारखाच दिसला असता. दिलीप कुमार आणि माझ्याप्रती तुझी भावना ही तू अनेकदा बोलून दाखवली आहेस.

Shah Rukh Khan News

मला शाहरुखचं एका गोष्टीसाठी कौतुक आहे ते म्हणजे त्यानं नेहमीच त्याच्या कृतीतून आदर दाखवला आहे. माझ्या कठीण काळात त्यानं माझ्याशी संवाद साधला आहे. यासाठी मी नेहमीच त्याची आभारी असेन. अशा शब्दांत सायराजींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Koyna Dam Rainfall Eases: कोयना धरण पाणलोटात पावसाचा जोर ओसरला; दरवाजे सहा फुटांवरून पाच फुटांवर, विसर्गात कपात

Dhoni - Pant: धोनी चालवत होता गाडी अन् शेजारी बसला होता पंत! कॅप्टनकूलच्या मर्सिडिजमधून एकत्र बाहेर पडतानाचा Video Viral

SCROLL FOR NEXT