Shahrukh Khan and Abram viral video esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan Video : 'अबराम'च्या शाळेत 'किंग खान' प्रमुख पाहुणा! वर्गातल्या पोरांचा नुसता दंगा!

शाहरुख खान (Shah Rukh Khan Video) अबरामच्या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून गेला होता. त्याचे व्हिडिओ आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Shahrukh Khan and Abram Photos: बॉलीवूडचा किंग शाहरुख हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि पोस्टमुळे चर्चेत असतो. आता तो (Shah Rukh Khan Viral Video) त्याच्या लाडक्या लेकाच्या अबरामच्या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून गेला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रसंगी त्यानं दिलेला परफॉर्मन्स हा चर्चेचा विषय आहे.

आपल्या शाळेत चक्क शाहरुख खान आला आहे हे पाहुन मुलांना कमालीचा आनंद झाला होता. ते त्याच्या नावानं आवाज देत होते. (Shah Rukh Khan Latest News) शाहरुखनंही त्यांना नाराज न करता त्यांच्या सोबत मोठ्या आनंदानं फोटोसेशन करुन त्यांना खूश केले. स्वताही त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. निमित्त होतं धीरुभाई अंबानी शाळेतल्या एका (DAIS) खास महोत्सवाचं.

त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून शाहरुख उपस्थित होता. (Shah Ruk Abram News) शाहरुखचा लाडका लेक त्या शाळेत शिकतो. यावेळी शाहरुखच्या अबरामनं गिटार वाजवत केलेलं सादरीकरण उपस्थितांच्या कौतुकाचा विषय असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी देखील याच शाळेतील एका सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. यात अमिताभ बच्चन. ऐश्वर्या रॉय बच्चन, जया बच्चन, शाहिद कपूर, करिना कपूर यांचा समावेश होता.

आपल्या मुलांप्रती शाहरुखचा नेहमीच वेगळा अंदाज दिसून आला आहे. मग ते सुहानाच्या द आर्चिज चा प्रीमिअर असो किंवा अबरामच्या शाळेतील गॅदरिंग त्याला शाहरुखनं आवर्जुन उपस्थिती लावली आहे. इंस्टा बॉलीवूडनं तो व्हिडिओ शेयर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया शाहरुखविषयी खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

सोशल मीडियावर शाहरुखचे कित्येक फॅनपेजही आहेत त्यांनी देखील तो व्हिडिओ शेयर करुन नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, अबरामच्या शाळेतील एका कार्यक्रमाप्रसंगी किंग खानला प्रमुख पाहुणा म्हणून बोलविण्यात आले होते. यावेळी त्यानं आपल्या उपस्थितीनं आणि सादरीकरणानं चाहत्यांना जिंकून घेतले.

त्या फोटोंमध्ये शाहरुख मुलांशी संवाद साधताना दिसतो आहे. त्यांच्याशी मोकळेपणानं गप्पा मारतो आहे. त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसत आहे. त्याच्या त्या फोटोंना नेटकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT