Shah Rukh-Akshay and Ajay Devgn HC Notice:  Esakal
मनोरंजन

Shah Rukh-Akshay and Ajay Devgn HC Notice: पान मसाल्याची जाहिरात करणं भोवलं! शाहरुख-अक्षय आणि अजय देवगणला हायकोर्टानं बजावली नोटीस

अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण हे त्याच्या पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत.

Vaishali Patil

Allahabad High Court Notice: गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण हे त्याच्या पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. या जाहिरातीमुळे अनेकांनी या कलाकारांवर टीका केली आहे.

आता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने नोटीस बजावली आहे. पान मसाला कंपन्यांच्या जाहिराती प्रकरणी या तिघांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या वकिलाने लखनौ खंडपीठाला सांगितले की, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. या कारणास्तव ही याचिका फेटाळण्यात यावी. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या एकल खंडपीठाने ही अवमान याचिका मंजूर केली असून पुढील सुनावणीची तारीख 9 मे 2024 देण्यात आली आहे.

न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने यापूर्वी केंद्र सरकारला याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. या कलाकारांवर कारवाई व्हायला हवी, असा युक्तिवाद करण्यात आला

या प्रकरणी याचिकाकर्त्याचे सांगितले आहे की, 22 ऑक्टोबर रोजी सरकारला अहवाल देण्यात आला होता, मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. यानंतर अवमान याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली होती.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी सांगितले की, याप्रकरणी केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

त्याचवेळी, न्यायालयाला असेही सांगण्यात आले की, करार रद्द करूनही अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहिरातीत दाखवल्याबद्दल संबंधित पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. उच्च न्यायालयाने आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 तारखेला 2024 ला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT