Jawan Shah Rukh Khan Movie Broke All Records  esakal
मनोरंजन

Jawan 2: शाहरुखचा जवान 2 येणार? थेट संजू बाबाने दिली 'या' सीन मधुन तगडी हिंट

Vaishali Patil

Jawan 2: गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला शाहरुख खान स्टारर 'जवान' हा चित्रपट अखेर आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. 7 तारखेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला आणि चाहत्यांनी थिएटरमध्ये एकच गर्दी केली.

या चित्रपटाचा सकाळी 6 वाजताचा शो देखील हाऊसफुल्ल झाला आहे. त्यामुळे आता शाहरुखचा जवान हा रिलिजच्या ओपनिंग डेला कमाल करत जबरदस्त ओपनिंग करेल अशी अपेक्षा निर्माते आणि प्रेक्षकांना होती.

तसचं काहीस झालं देखील. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेसमोर आले आहेत. मीडीया रिपोर्टनुसार जवानने भारतात तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 150 कोटींहून अधिक कमाई केली.

शाहरुखच्या चाहत्यांनी तर या चित्रपटाच्या रिव्ह्यूने सोशल मीडियावर वर्चस्व केलं आहे. आता त्यातच आणखी एक चर्चा सोशल मीडियावर खुपच रंगली आहे. एकीकडे या सिनेमाला चाहते 'मेगा ब्लॉकबस्टर' म्हणत आहे तर दुसरीकडे शाहरुख आणि अॅटलीची जोडी पुन्हा 'जवान 2' साठी सज्ज असल्याचं दिसतयं.

आता शाहरुख आणि अॅटलीसोबत संजय दत्त सहभागी होऊन 'जवान 2' देखील घेऊन येणार अशा बातम्या चर्चेत आहेत. जे प्रेक्षक चित्रपट पाहून आलेत त्याच्या तोंडूनही हेच वाक्य निघतांना दिसत आहे. त्याला कारण ठरतयं चित्रपटातील एक सीन आणि काही तथ्य.

'जवान' चित्रपट शेवटच्या टप्प्यात असतांनाच या चित्रपटानेच हा स्पॉयलर अलर्ट दिला आहे. खरे तर 'जवान'मध्ये शाहरुख खान आझादची भूमिका साकारत आहे. तर चित्रपटाच्या शेवटी संजय दत्तची एंट्री दाखवली आहे. तो या चित्रपटात माधवन नाईकची भुमिका साकारतोय. चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये हे दोघेही एका मिशनबाबत चर्चा करतांना दिसतात. यात माधवन आझादला एक लिफाफा देतात आणि हे दुसरं मिझन असल्याचं सांगतात.

तर दुसरी शक्यता यावरुन वर्तवण्यात येत आहे की, जवानमध्ये सहा मुलींची गँग दिसते. या मुलींची स्वत:चीच एक स्टोरी आहे ज्याचा बदला ते घेत असतात. अशातच आता केवळ दोनच मुलींची स्टोरी या चित्रपटात सांगितली आहे. त्यामुळे ती कहाणी देखील अपुर्ण आहे. त्यामुळे आता 'जवान 2' ने येणार ही चर्चा रंगली आहे.

त्यामुळे आता शाहरुख आणि संजय दत्त कोणत्या मिशन बद्दल बोलताय आणि त्या मुलींची पुढची स्टोरी काय याचा खुलासा आणि ते 'जवान 2' च्या नियोजनात आहे का हे तर फक्त शाहरुख खान आणि अॅटलीच सांगू शकतात.

तर यापुर्वी जेव्हा शाहरुखने X वर AskSRK सेशल घेतलं होतं. त्यावेळी एका चाहत्यांने त्याला विचारले होते की, जवान 2 कधी येणार यावर शाहरुखने आता मुलाचा जीव घेणार का अशी मजेशीर कमेंट केली होती. मात्र या बातमीने शाहरुखचे चाहते खुप उत्साहित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT