shah rukh khan and swiggy funny incident at they reach with food outside mannat SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: भावा आम्ही आलोय दार उघड, शाहरुखने प्रश्न विचारताच Swiggy बॉईजची कमाल

शाहरुख सुद्धा त्याच्या खास मिश्किल अंदाजात सर्व प्रश्नांची जमेल तितकी उत्तरं देत आहेत.

Devendra Jadhav

Shah Rukh Khan Swiggy News: शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. शाहरुख खानने पठाणच्या निमित्ताने #AskSRK च्या माध्यमातून त्याच्या फॅन्ससोबत प्रत्यक्ष संवाद साधत आहे.

फॅन्स शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारून अक्षरशः भंडावून सोडत आहेत. शाहरुख सुद्धा त्याच्या खास मिश्किल अंदाजात सर्व प्रश्नांची जमेल तितकी उत्तरं देत आहेत. अशातच एक मजेशीर घटना घडलीय.

(shah rukh khan and swiggy funny incident at they reach with food outside mannat)

खरतर एका चाहत्याने शाहरुख खानला ट्विटरवर प्रश्न विचारला, भावा तू काय जेवलास? आपल्या अप्रतिम विनोदबुद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखने परत रिप्लाय करताना म्हटलं की.. \

काय झालं भाई तू स्वीगी मधून आहेस का? पाठवशील का जेवण? आता तो चाहता शाहरुखला जेवण पाठवू शकत नव्हता, पण या गोष्टीची स्वीगीने मात्र चांगलीच दखल घेतली.

खरं तर, शाहरुखचा असा प्रश्न पाहून स्विगीने लगेच प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, 'आम्ही स्वीगी कडून आहोत पाठवू का जेवण?' आता शाहरुखने यावर कोणतेही उत्तर दिले नाही.

पण दुसऱ्या ट्विटमध्ये स्विगीने आपल्या काही डिलिव्हरी बॉईजचा फोटो ट्विट केला आणि लिहिले की, 'आम्ही स्विगी वाले आहोत आणि आम्ही डिनर जेवण आणले आहे.' डिलिव्हरी बॉईजचा हा फोटो शाहरुखच्या 'मन्नत' घराबाहेरचा आहे.

प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान लवकरच 'जवान' चित्रपटात दिसणार आहे. अॅटलीच्या चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत आहे. हा अॅक्शन थ्रिलर ७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

'जवान' व्यतिरिक्त शाहरुख सलमान खानसोबत 'टायगर 3' आणि त्यानंतर राजकुमार हिरानीच्या 'डंकी'मध्ये दिसणार आहे. शाहरुखचा या वर्षीच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या पठाण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ला हटवून शुभमन गिलला वनडे संघाचा कर्णधार का केलं? अजित आगरकरने खरं कारण सांगितलं

TRPमध्ये मोठी उलथापालथ! दुसऱ्या स्थानावर घसरण्यापासून थोडक्यात वाचली सायली; टॉप १० मध्ये नव्या मालिकेची एंट्री; वाचा रिपोर्ट

Chandrakant Patil : संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार, चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या आदीच केली घोषणा

Nashik News : सिडकोत 'बॅनर हटाव' मोहीम! नवीन नाशिक महापालिकेची धडक कारवाई; शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यास सुरुवात

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी न्यायालयीन सुनावणीनंतर तुरुंगात

SCROLL FOR NEXT