Shah Rukh Khan Best Wishesh To PM Narendra Modi esakal
मनोरंजन

Narendra Modi : 'मोदीजी थोडी सुट्टी घ्या, मजा करा'! किंग खान जे बोलला त्यावरुन आता...., वेगळ्याच चर्चेला सुरुवात

यापूर्वी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत, राजकुमार राव, अनुपम खेर यांनी मोदीजींना शुभेच्छा दिल्या होत्या.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Best Wishesh To PM Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना वेगवेगळया क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केल्याचे दिसून आले. त्यात बॉलीवूडच्या सेलिब्रेटींचा देखील समावेश होता. आता किंग खान शाहरुखनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

यापूर्वी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत, राजकुमार राव, अनुपम खेर यांनी मोदीजींना शुभेच्छा दिल्या होत्या. यात कंगनानं तर मोदींची तुलना भगवान राम यांच्यासोबत केल्याचे दिसून आले होते. देशाच्या उभारणाती मोदी यांचे योगदान खूपच महत्वाचे असून देशवासियांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्यात त्यांनी केलेले काम कौतुकाचा विषय आहे. असे कंगनानं म्हटले होते.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या

यात किंग खान शाहरुखनं मोदीजींना शुभेच्छा दिल्या आहे. शाहरुख हा सध्या त्याच्या जवान नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले, त्याच्या या चित्रपटानं आतापर्यत सहाशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. शाहरुखनं त्याच्या खास शैलीत मोदींजीचे अभिष्टचिंतन करत त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मोदीजी तुम्ही थोडा वेळ सुट्टी घेऊन आराम का करत नाहीत. असा प्रश्न शाहरुखनं केला आहे.

मोदीजी तुम्हाला जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्ही थोडा वेळ स्वतासाठी काढत थोडी मौज करायला हवली. असे शाहरुख म्हणतो. त्याची ही पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. एकानं लिहिलं आहे की, तू जवान चित्रपट तयार करुन अगोदरच त्यांच्यावर भाष्य केले आहे. आणि आता आणखी कशाला जखमांवर मीठ चोळतोस...असे म्हटले आहे. यापूर्वी सोनू सूद, वरुण धवन यांनी देखील मोदीजींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमार, सलमान खाननं देखील मोदीजींना शुभेच्छा दिल्या आहेत. सलमाननं म्हटलं होतं की, आदरणीय मोदीजींना जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांनी देखील मोदीजींचे अभिष्टचिंतन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT