Dunki star Shah Rukh Khan Breaks Hearts of fans actor esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: 'यापुढे मी कधीही...' ती गोष्ट सांगून शाहरुखनं चाहत्यांना केलं निराश, काय म्हणाला किंग खान?

अशातच करण जोहर दिग्दर्शित कुछ कुछ होता है या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं खास स्क्रिनिंगचे आयोजन मुंबईतील एका थिएटरमध्ये करण्यात आले होते.

युगंधर ताजणे

Dunki star Shah Rukh Khan Breaks Hearts of fans actor : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा जवान ब्लॉकबस्टर झाला. त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यानं सातशे कोटींपेक्षा जास्त कमाईही केली. या वर्षी शाहरुखचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यात पठाणनं एक हजार कोटींची कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता.

शाहरुखचा याच वर्षी राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी नावाचा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्याचीही चाहत्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. शाहरुखनं जवानच्या निमित्तानं वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर केले होते. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणारा हिंदी चित्रपट म्हणून जवानच्या नावाची नोंद झाली आहे.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

अशातच करण जोहर दिग्दर्शित कुछ कुछ होता है या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं खास स्क्रिनिंगचे आयोजन मुंबईतील एका थिएटरमध्ये करण्यात आले होते. १६ ऑक्टोबर १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी, काजोल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत बॉलीवूडच्या शंभर सर्वोत्तम चित्रपटांमध्ये देखील स्थान मिळवले होते.

कुछ कुछ होता है च्या स्क्रिनिंगला शाहरुख उपस्थित होता. यावेळी त्याला जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याला उत्तर देताना त्यानं जी प्रतिक्रिया दिली त्यावरुन तो चर्चेत आला आहे. किंग खान असं काही बोलेल असे चाहत्यांना वाटले नव्हते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्या विधानानं धक्का बसला आहे. चाहत्यांनी शाहरुखला यापुढील काळातील रोमँटिक चित्रपटावरुन प्रश्न विचारण्यात आला होता.

शाहरुख या स्क्रिनिंगसाठी मोठ्या सुरक्षेसह आला होता. त्याला सध्या वाय प्लस नावाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी त्याला जीवाला धोका असल्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे ही सुरक्षाव्यवस्था देण्यात आली आहे. स्क्रिनिंगच्यावेळी शाहरुखला तो आगामी काळात रोमँटिक चित्रपटात काम करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

शाहरुखनं त्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, मी करण जोहर, आदित्य चोप्रा, यश चोप्रा आणि यश जोहर यांच्यामुळे स्टार झालो आहे. त्यांचा मी नेहमीच आभारी आहे. पण आता यापुढील काळात मी लवस्टोरी करेन किंवा नाही याविषयी सांगू शकत नाही. आता जवान मुलांना ते रोल्स करु द्या...अशी मिश्किल टिप्पणी शाहरुखनं यावेळी केली.

शाहरुखचे ते उत्तर ऐकल्यानंतर मात्र उपस्थित चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. जर यश जोहर, यश चोप्रा, करण जोहर, आणि आदित्य चोप्रा माझ्या पाठीशी नसते तर मी आज मोठा स्टार झालो नसतो. जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. अशी भावना किंग खाननं यावेळी व्यक्त केली.

शाहरुखच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा डंकी नावाचा चित्रपट येत्या २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच वेळी बॉलीवूडमध्ये आणखी बिग बजेट आणि बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रभासच्या सालारचा समावेश आहे. अशावेळी कोण यशस्वी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

RCB संघ मुंबईवरील विजयानंतरही तिसऱ्या क्रमांकावरच; प्रत्येक संघाच्या ४ सामन्यांनंतर कशी आहे Points Table ची स्थिती

SCROLL FOR NEXT