Shah Rukh Khan movie esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : 'तुम्हाला शाहरुखचा कंटाळा कसा येत नाही, तो तर सारखा...' पाकिस्तानच्या अलीची जळजळीत प्रतिक्रिया

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याचा पुढच्या आठवड्यामध्ये पठाण प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan Bollywood King Khan Pathaan : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याचा पुढच्या आठवड्यामध्ये पठाण प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याची गेल्या तीन वर्षांपासून चर्चा आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर शाहरुख प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र पठाणवरुन वादालाही सुरुवात झाली आहे. देशभरात या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी होताना दिसते आहे.

देशभरातील काही राज्यांमध्ये पठाणवरून थिएटर्समध्ये गदारोळ झाल्याचे दिसून आले आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये शाहरुखच्या पठाणला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याचे दिसून आले आहे. अयोध्येतील महंतांनी तर शाहरुखला जीवे मारण्याची धमकीच दिली होती. आता यासगळ्यात पाकिस्तानच्या एका अभिनेत्याची भर पडली आहे.

Also Read - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

पाकिस्तानी अभिनेता अली खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानं किंग खानवर केलेली टिप्पणी ही चाहत्यांना काही आवडली नाही. म्हणून अली खानला ट्रोल देखील करण्यात आले आहे. अली खान हा तर ब्रिटिश वंशाचा आहे. मात्र तो पाकिस्तान आणि भारतातील फिल्म इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यानं शाहरुखच्या अभिनयाची थट्टा उडवली आहे.

तुम्हाला शाहरुख सारख्या ओव्हर अॅक्टिंग करणाऱ्या अभिनेत्याचा कंटाळा कसा येत नाही असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारला आहे. विशेष म्हणजे अली शाहरुखसोबत डॉनमध्ये दिसला होता. त्यानं तर शाहरुखविषयी बोलताना म्हटले आहे की, तो नेहमीच क..क....क...किरण असं करतो आणि त्याच्या अभिनयाला पसंती मिळते, चाहतेही तो अभिनय वर्षानुवर्षे पाहतात.

शाहरुखनं त्याच्या त्या डर चित्रपटामध्ये अशाप्रकारचा अभिनय का केला होता याचं उत्तर मला अजुनही मिळालेलं नाही. मी ज्यावेळी त्याला भेटलो होतो तेव्हा तो मला फारच अजब वाटला होता. शाहरुखचा स्वभाव मला वेगळा वाटला. आणि मला खूप वेळ त्या सीनसाठी थांबावे लागले होते. तो किस्सा होता डॉन २ च्या वेळचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT