Shah Rukh Khan:  Esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: दिग्दर्शकाच्या आईला पाहताच शाहरुखच्या कृतीनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष! होतोय कौतुकाचा वर्षाव

Vaishali Patil

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले. या यशानंतर आता चाहत्यांच्या नजरा त्याच्या आगामी चित्रपट 'जवान'वर खिळल्या आहेत. अ‍ॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट येत्या सात सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची क्रेझ चाहत्यांच्यामध्ये खुप दिसून येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता फक्त ३ दिवस उरले आहेत.

या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही चाहत्यांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, चेन्नईमध्ये या चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम पार पडला. ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाहरुख खानने असं काही तरी केलं की जे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी शाहरुखच्या कौतुकाचे पुल बांधले.

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ चेन्नईतील एका कार्यक्रमाचा आहे. ज्यात शाहरुखने त्याच्या 'जवान' चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटलीच्या आईला वाकून नमस्कार केला. अॅटली आपल्या आईची शाहरुख खानशी ओळख करून दिली.

शाहरुखने आधी त्यांचा आशिर्वाद घेतला आणि नंतर त्यांना मिठी मारली. यानंतर अॅटलीने त्यांची शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी ओळख करून दिली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या नम्रतेचे कौतुक केले.

जवान चित्रपटात दक्षिणेतील एक मोठी स्टार कास्ट आहे. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तो पिता-पुत्राच्या भूमिकेत आहे. यापैकी वडील कॅप्टन आहेत, तर मुलगा पोलिस आहे.

या चित्रपटात शाहरुख खान सोबत नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यासोबत चित्रपटात सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

'जवान'मध्ये दीपिका पदुकोण, थलपथी विजय देखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

SCROLL FOR NEXT