मनोरंजन

Shah Rukh Khan: बिचारा शाहरुख! आर्यन त्यालाही कपडे स्वस्तात देईना..

Vaishali Patil

बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. त्याच्यासोबतच त्याची फॅमिलीही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्याची मुलगी सुहाना तर कधी त्याचा मुलगा आर्यन.

आर्यन खान तर बऱ्याच वेळा ट्रोलही होत असतो. मात्र सध्या तो त्याच्या नवीन व्यसायामुळे चर्चेत आहे. त्याने स्वत:चा नवीन कपड्यांचा ब्रँड Dyavol X लाँन्च केला आहे. काही दिवसांपुर्वीच त्याने याच लाँचिंग केलं ज्यात शाहरुखचाही सामावेश होता.

मात्र तो या कपड्याच्या किमतीवरुनही बराच ट्रोल झाला. कारण त्याच्या या ब्रँडमधील कपड्याच्या किमती लाखात आहे. आता यावरच जेव्हा शाहरुखला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने दिलेलं उत्तरही चर्चेत आलं आणि सोशल मिडियावर त्याची चर्चा सुरु झाली.

त्याच झालं असं की, शाहरुख खान बऱ्याचदा त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ट्विटरवर #AskSRK सेशन घेतो आणि चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देत असतो. शनिवारी रात्रीही असाच काहीसा प्रकार घडला. एकीकडे त्याने सोशल मीडियावर 'जवान' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आणि ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला.

यावेळी एका ट्विटर यूजरने त्याला त्याचा मुलगा आर्यन खानच्या ब्रँडच्या कपड्यांबद्दल प्रश्न विचारला. या वापरकर्त्याने शाहरुखला त्याची किंमत थोडी परवडणारी करण्यास सांगितली जेणेकरुन त्याच्यासारखे लोक ते कपडे खरेदी करू शकतील.

#AskSRK सत्रादरम्यान, एका युजरने शाहरुखला आर्यनच्या कपड्यांच्या ब्रँडची किंमत परवडणारी किंमत ठेवण्यास सांगितलं. शाहरुखला साठी त्याने लिहिले की, 'डायव्होल एक्सचे काही जॅकेट जरा हजार दोन हजाराचेही बनवा, ते वाले खरेदी करण्यात तर घरी जाईल आमचं.' यावर शाहरुखने लगेचच उत्तर दिले.

यावर शाहरुख खान म्हणाला, 'D'Yavol X चे हे लोक मला देखील स्वस्तात विकत नाहीत, मी काहीतरी करतो. #जवान.'

मात्र हे उत्तर नेटकऱ्यांना खुपच कॉमन वाटलं जसं कपडे खरेदी करण्यासाठी गेल्यावर सामान्यतः दुकानदार जे उत्तर देतात तेच उत्तर शाहरुखनंही दिलं असल्याच ते बोलत आहेत.

आर्यन खानने लॉन्च केलेल्या कपड्यांचा ब्रँड Dyavol X चे जॅकेट 2 लाख रुपयांचे आहे आणि टी-शर्टची सुरुवातीची किंमतच सुमारे 24 हजारांपासून सुरू होते. लॉन्च झाल्यानंतर, ही साइट त्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे खूप चर्चेत आली. यामुळे लोकांनी आर्यन खानला खूप ट्रोल केले. शेवटी #AskSRK सत्रादरम्यान या ब्रँडच्या उच्च किंमतीवर शाहरुख खान प्रथमच बोलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

Maharashtra Monsoon: मुसळधार पावसानंतर अचानक उघडीप! घाटमाथा-कोकणात पावसाचा जोर ओसरला; IMD ने सांगितले कारण

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT