Shah Rukh Khan esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: 'BCCI ने मानधनाचा घेतलेला निर्णय म्हणजे...' किंग खानची मोठी प्रतिक्रिया

आता शाहरुखनं बीसीसीआयच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan News: भारतीय क्रिकेट बोर्डानं घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा अनेकांच्या कौतूकाचा विषय ठरताना दिसतो आहे. त्यावर राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूडच्या किंग खान शाहरुखची प्रतिक्रिया देखील आता चर्चेत आली आहे. किंग खानचा सोशल मीडियावर असणारा चाहतावर्ग मोठा आहे. त्यानं क्रीडा क्षेत्रात घेतलेला सहभाग, आयपीएलमधील त्याची कामगिरी आणि चक दे सारख्या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय राहिली आहे.

आता शाहरुखनं बीसीसीआयच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुखपूर्वी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. बीसीसीआयनं पुरुष क्रिकेटरांना जे मानधन दिले जाते तेच मानधन महिला क्रिकेटपटूंना दिले जाईल. असा निर्णय दिला आहे. त्यावरुन चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यात किंग खान शाहरुखच्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतले आहे. शाहरुख सहसा कोणत्याही राजकीय, सामाजिक निर्णयावर त्याची प्रतिक्रिया देत नाही.

बीसीसीआयच्या निर्णयावरील प्रतिक्रियेनं किंग खान चर्चेत आला आहे. आपल्या प्रतिक्रियेमध्ये तो म्हणतो, बीसीसीआयचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा खरोखरीच ऐतिहासिक म्हणावा लागेल. त्यासाठी त्यांना धन्यवाद द्यावे लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर त्यावर निर्णय झाला आहे. आणि त्याचे अनेक स्तरांतून कौतूकही होताना दिसते आहे. केवळ शाहरुखच नाही तर अनुष्का शर्मानं देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शाहरुखनं बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांचे ट्विट रिट्विट करुन त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तो म्हणतो, किती मोठा फ्रंट फुट शॉट लगावला आहे. आता खेळ सर्वांसाठी समान झाला आहे. हा निर्णय म्हणजे एका वेगळ्या पर्वाची सुरुवात म्हणावी लागेल. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं देखील जय शाह यांचे कौतूक केले आहे. अभिषेक बच्चननं लिहिलं आहे की, खूपच छान....या सगळ्या सेलिब्रेटींच्या प्रतिक्रियेची चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

SCROLL FOR NEXT