shah rukh khan, hockey team  (hockey pic credit- twitter/Great Britain Hockey)
मनोरंजन

'मन दुखावलं, पण..'; भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक

'चक दे इंडिया' या चित्रपटात शाहरुखने हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.

स्वाती वेमूल

टोकियो ऑलिम्पिक Tokyo Olympics स्पर्धेत भारतीय महिला हॉकी Indian women's hockey team संघाला ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आलं. ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. पहिल्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनने आपला धमाका दाखवला आणि भारतीय महिला संघाला 2-0 असे पिछाडीवर टाकले. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाने आपल्यातील ताकद दाखवून दिली. या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाने तीन गोल डागले. अखेरच्या क्वार्टरमधील गोलच्या जोरावर ग्रेट ब्रिटनने 4-3 असा विजय मिळविला. पदक मिळाले नसले तरी भारतीय महिला संघाच्या कामगिरीचं अनेकांनी कौतुक केलं. अभिनेता शाहरुख खानने Shah Rukh Khan संघासाठी ट्विट केलं आहे. शाहरुखचा हॉकी या खेळावर 'चक दे इंडिया' (chak de india) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात त्यानं कबीर खान नावाच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.

शाहरुखचं ट्विट-

'मन दुखावलं; पण अभिमानाने मान उंचावण्यासाठी अनेक कारणं आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने चांगली कामगिरी केली. तुम्ही भारतातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा दिली. हाच एक विजय आहे', असं शाहरुखने लिहिलं.

याआधीही शाहरुखने भारतीय महिला हॉकी संघासाठी ट्विट केलं होतं. प्रशिक्षक शॉर्ड मारिनचं कौतुक करत त्याने त्यांची तुलना 'चक दे इंडिया'मधील कबीर खानशी केली होती. त्यानंतर किंग खानचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं.

पराभवानंतर खेळाडूंना अश्रू अनावर

या सामन्यातील पराभवानंतर भारतीय महिला संघातील खेळाडूंना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. ग्रेट ब्रिटनच्या आक्रमण लिलया पेलणाऱ्या सविता पुनियाला मैदानातच रडू कोसळले. तिच्याशिवाय इतर महिला खेळाडूंनाही पराभवानंतर अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू भारतीय महिला खेळाडूंचे सांत्वन करतानाचे चित्रही दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन नवीन माझे बॉस! PM मोदींनी भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिल्या शुभेच्छा

धुमधडाक्यात झाला प्रसाद ओकच्या मुलाचा साखरपुडा; कोण आहे अभिनेत्याची होणारी सून? फोटो पाहून रंगली भलतीच चर्चा

अजित आगरकरचे धक्कातंत्र! Virat Kohli, रोहित शर्मा यांना बसणार मोठा फटका, BCCI कडे पाठवलाय प्रस्ताव, आता...

ChatGPT ला 'Please' आणि 'Thank You' म्हणताय? ही चूक पडू शकते महागात; वैज्ञानिकांनी उघड केलं सिक्रेट, सांगितले उद्धटपणे बोलण्याचे फायदे

Vande Bharat Express: आणखी एक ‘वंदे भारत’ २० डब्यांची होणार, वेळापत्रतकातही बदल; जाणून घ्या कोणत्या?

SCROLL FOR NEXT