suhana khan Sakal
मनोरंजन

Suhana Khan: बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुहानाचा जलवा, शाहरुखची लाडकी लेक बनली ब्रँड ॲम्बेसेडर

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुहानाने तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Aishwarya Musale

शाहरुख खान आणि गौरी खानची लाडकी सुहाना खानला तिच्या बॉलिवूड पदार्पणापूर्वीच एक मोठी संधी मिळाली आहे. सुहाना आता एका मोठ्या ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि त्याआधीच तिने जाहिरातींच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. सुहाना न्यूयॉर्क स्थित ब्युटी ब्रँड 'मेबलिन'ची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे.

सोमवारी मुंबईत आयोजित एका मीडिया इव्हेंटमध्ये सुहानाच्या संदर्भात ही घोषणा करण्यात आली. सुहाना खान या वर्षी झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे आणि त्याआधी एका आंतरराष्ट्रीय ब्रँडशी तिच्या संलग्नतेमुळे तिचा पोर्टफोलिओ आणखी प्रभावी झाला आहे. या इव्हेंटमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती.

या प्रसंगाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात सुहानाने पहिल्यांदाच मीडियाशी संवादही साधला. सुहाना म्हणाली की, ब्रँड अॅम्बेसेडर होण्यासाठी आणि या ब्रँडचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे.

सुहाना खान लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या द आर्चीज या चित्रपटात दिसणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा एक लाईव्ह-अ‍ॅक्शन म्यूजिकल फिल्म आहे. सुहाना खान व्यतिरिक्त दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा देखील पदार्पण करत आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की 'द आर्चीज' हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा सिक्वेल चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा 1960 च्या दशकातील आहे. 'द आर्चीज'ची कथा कॉमिक बुक कॅरेक्टर आर्ची एंड्रयूज आणि त्याच्या मित्रांवर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT