Dunki actor Shah Rukh Khan will announce 
मनोरंजन

Shah Rukh Khan : नव्या वर्षातही किंग खान चाहत्यांना देणार सरप्राईज! लवकरच करणार 'त्या' चित्रपटांची घोषणा

हिंदी चित्रपट विश्वाचा बादशहा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या किंग खान शाहरुखची गोष्टच वेगळी आहे.

युगंधर ताजणे

Dunki actor Shah Rukh Khan will announce : हिंदी चित्रपट विश्वाचा बादशहा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या किंग खान शाहरुखची गोष्टच वेगळी आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शाहरुखनं त्याच्या नावाची ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली आहे. गेल्या वर्षी त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्या तीनही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केल्याचे दिसून आले.

पठाण, जवान आणि डंकी या शाहरुखच्या तीनही चित्रपटांनी प्रेक्षकांना, चाहत्यांना जिंकून घेतल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता नव्या वर्षी शाहरुख चाहत्यांना काय गिफ्ट देणार, थोडक्यात तो त्याच्या कोणत्या चित्रपटांची घोषणा करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पठाणनं हजार कोटींची कमाई केली होती. दुसरीकडे जवाननं सातशे कोटी तर डंकीनं आतापर्यत तीनशे कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे.

येत्या काळात शाहरुख कोणत्या चित्रपटांमध्ये दिसणार याविषयी त्याला नेटकऱ्यांनी प्रश्नही विचारले होते. आस्क एसआरके या कार्यक्रमांतर्गत शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी नव्या वर्षात तू आम्हाला काय ट्रीट देणार असे प्रश्न विचारले होते. त्यावर त्यानंही आपण चाहत्यांना निराश करणार असल्याचे म्हटले. अशी माहिती आहे. सध्या शाहरुख हा त्याच्या परिवारासोबत लंडनमध्ये व्हॅकेशन इंजॉय करताना दिसतो आहे.

शाहरुखचे येत्या वर्षातही तीन चित्रपट येणार असल्याची चर्चा आहे. मात्र ते कोणते याविषयी अधिकृतरीत्या कोणताही खुलासा झालेला नाही. असं बोललं जातं आहे की, येत्या वर्षात शाहरुख मोठ्या सावधानपूर्वक त्याच्या चित्रपटाची निवड करतो आहे. जेणेकरुन चाहते निराश होणार नाहीत. एका मीडिया चॅनेलशी बोलताना शाहरुखनं म्हटले होते की, येत्या काळात आपण अशा भूमिका निवडणार आहोत ज्या आपल्या वयाला सूट होतील...

या वर्षी मार्च आणि एप्रिल पासून शाहरुख त्याच्या काही प्रोजेक्टला सुरुवात करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख त्याच्या लाडक्या लेकीसोबत एका मोठ्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सुहानानं यापूर्वी द आर्चीज मध्ये डेब्यू केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT