Shahrukh's 'Dunki' will be tax free? Special screening at Rashtrapati Bhavan  SAKAL
मनोरंजन

Dunki Shah Rukh Khan: शाहरुखचा 'डंकी' होणार टॅक्स फ्री? राष्ट्रपती भवनात विशेष स्क्रिनिंग

शाहरुख खानचा डंकी टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आलीय

Devendra Jadhav

Dunki Shah Rukh Khan Tax Free News: 'पठाण' आणि 'जवान' या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर 'डंकी' हा शाहरुख खानचा 2023 चा तिसरा चित्रपट आहे. 21 डिसेंबर रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा सिनेमा प्रेक्षकांंचं प्रेम मिळवत आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्याचवेळी, आता या चित्रपटाशी संबंधित एक चांगली बातमी समोर येत आहे. राष्ट्रपती भवनात 'डंकी'चे स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे.

शाहरुख खानच्या 'डंकी'चे स्पेशल स्क्रिनिंग आज रविवारी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात होणार आहे. संसदीय अधिकार्‍यांसाठी हा विशेष शो आयोजित करण्यात आलाय.

याशिवाय शाहरुख खानचे चाहते डंकी टॅक्स फ्री करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात डंकी टॅक्स फ्री झाला तर आश्चर्य वाटायला नको.

शाहरुखच्या डंकी या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. 'डंकी'चे आत्तापर्यंतच्या कलेक्शनचे आकडे खुपच कमी आहे. त्यामुळे सध्याचा बॉक्स ऑफीस रिपोर्ट बघता राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी हा चित्रपट जवान-पठाणचा विक्रम मोडू शकणार नाही असं वाटत आहे.

आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 29.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'डंकी' बद्दल बोलायचे झाले तर हा एक कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी एकत्र ही कथा लिहिली आहे. चित्रपटाची कथा अशा लोकांची आहे जे चुकीच्या मार्गाने आपला देश सोडून परदेशात कमाईसाठी जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार! 'या'१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी, हवामानाचा विभागाचा अंदाज

Suraj Sakhare Firing in Kolhapur : डोळ्यांदेखत गोळीबार पाहून बोबडीच वळली; टायर फुटल्यासारखा मोठा आवाज अन्..; प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितला घटनेचा थरार

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मगरपट्ट्याचा उड्डाण पूल पाडणार; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूल हाेणार, मेट्रो विस्तारालाही गती

SCROLL FOR NEXT