shah rukh khan, pathaan,  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: जळगाव मध्ये शाहरुखच्या फॅन्सनी केलं रक्तदान, शाहरुखलाही आमंत्रण

'सर आ जाओ जळगाव' असं म्हणत या फॅन क्लबने शाहरुखला सुद्धा खास निमंत्रण दिलंय.

Devendra Jadhav

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठान' हा सिनेमा रिलीज होण्यास फक्त एक दिवस बाकी आहे. चार वर्षांनंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. रिलीजच्या आधी, अभिनेता त्याच्या चाहत्यांशी चॅट करण्यासाठी ट्विटरवर ऍक्टिव्ह आहे. सध्या शाहरुख सोशल मीडियावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन करत आहे. सध्या ट्विटरवर शाहरुख #AskSRK च्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधत आहे. त्यानिमित्ताने शाहरुखच्या जळगावमधल्या फॅन्स क्लबनी खास रक्तदान शिबीरचं आयोजन केलंय. याशिवाय 'सर आ जाओ जळगाव' असं म्हणत या फॅन क्लबने शाहरुखला सुद्धा खास निमंत्रण दिलंय.

जळगाव मधील SRK युनिव्हर्स या शाहरुख खानच्या फॅन क्लबने खास रक्तदान शिबीर आयोजित केलंय. या क्लबने त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. 'सर आमच्या जळगाव बॉईजने तुमच्यासाठी खास रक्तदान शिबीर आयोजित केलंय. तुम्ही पाहिलं का?' असं ट्विट करत या फॅन क्लबने शाहरुख खानला ट्विटर वर टॅग केलंय. शाहरुखने सुद्धा या जळगाव फॅन क्लबचा फोटो त्याच्या अकाउंटवर शेयर केलाय. 'खूप सुंदर भावना.. धन्यवाद' असं म्हणत शाहरुखने त्याच्या फॅन क्लबचं कौतुक करून त्यांचे आभार मानले आहेत

बॉलीवूड किंग खानच्या पठाण चित्रपटाची प्रेक्षक गेल्या चार वर्षांपासून वाट पाहत होते. शाहरुखनं या सिनेमासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असून त्याने सिनेमाचं तगडं प्रमोशन केलंय. एकूणच पठाण ची सगळीकडे जोरदार हवा आहे

शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम,डिंपल कपाडिया,आशुतोष राणा सोबत अेनक स्टार्स असणार आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यश राज फिल्म्सच्या प्रॉडक्शन अंतर्गत हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT