Shah rukh khan pathaan movie  Google
मनोरंजन

Pathaan: शाहरुखच्या चाहत्याचा कहर! रडत-रडत ट्वीटरवर शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाला,'आत्महत्या करेन जर..'

शाहरुखचा 'पठाण' येत्या २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे त्यादरम्यान आता हा असा शॉकिंग व्हिडीओ चाहत्यानं पोस्ट केल्यानं खळबळ उडाली आहे,

प्रणाली मोरे

Pathaan: चाहते आपल्या आवडत्या कलाकाराच्या प्रेमापोटी ज्या गोष्टी करतात त्या कधी थक्क करणाऱ्या असतात तर कधी हैराण करून सोडणाऱ्या असतात. असंच शाहरुखच्या एका चाहत्यानं आता 'पठाण' संबंधित एक शॉकिंग गोष्ट बोलून दाखवली आहे.

शाहरुखच्या चाहत्यानं ट्वीटरवर रडत-रडत एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सांगितलं आहे की जर तो २५ जानेवारीला 'पठाण' पाहू नाही शकला तर तो आत्महत्या करेन.

चाहत्याचं म्हणणं आहे की त्याच्याकड पैशाची अडचण असल्यामुळे तो सिनेमाचं तिकीट खरेदी करू शकत नाही आणि तो शाहरुखचा मोठा चाहता आहे म्हणून त्याला काही करुन २५ जानेवारीलाच तो सिनेमा पहायचा आहे. आणि असं घडलं नाही तर त्यानं आत्महत्या करण्याचं ठरवलं आहे. (Shahrukh Khan fan shocking video for pathaan movie)

सोशल मीडियावर रडत-रडत शेअर केलेल्या व्हिडीओत चाहत्यानं लोकांना त्याची मदत करण्याचं आवाहन केलं आहे,जेणेकरुन त्याला 'पठाण' सिनेमाचे तिकीट खरेदी करता येईल. शाहरुख खानच्या या चाहत्याचं नाव रियान सांगितलं जात आहे.

रियानने सोशल मीडियावर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ज्यात त्यानं लोकांकडे पैशाची मदत करण्याचं आवाहन केलंय जेणेकरुन त्याला रिलिजच्या पहिल्याच दिवशी 'पठाण' पाहता येईल.

रियान त्या व्हिडीओ पोस्टमध्ये म्हणताना दिसत आहे की,''पठाण' सिनेमा मी कधीच पाहू शकणार नाही. मी शाहरुखचा मोठा चाहता आहे. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. पण माझ्याकडे पैसे नसल्याकारणानं मी त्याचा 'पठाण' सिनेमा पाहू शकणार नाही''.

''माझी मदतही कुणी करत नाहीय. मला सिनेमाच्या तिकीटासाठी कृपया कोणीतरी आर्थिक मदत करा. मी हात जोडतो..जर मदत नाही केली तर मी आत्महत्या करेन. तलावात जीव देऊन माझं आयुष्य संपवेन''.

रियानचा हा व्हिडीओ पोस्ट झाल्यावर त्याच्यावर खूपजणं कमेंट्स करताना दिसत आहेत. काही लोकांनी त्याला त्याचा व्हिडीओ डिलीट कर आणि डीएम चेक कर,कितीतरी शाहरुखचे चाहते तुझी मदत करण्यास इच्छुक आहेत''. असा प्रेमळ सल्ला दिला आहे.

कितीतरी लोकांनी रियानला सिनेमाचं तिकीट खरेदी करुन देऊ असं म्हटलं आहे. लोकांनी रियानचा पत्ता देखील विचारला आहे..जेणेकररुन त्याचं जवळच्या सिनेमागृहातलं तिकीट बूक केलं जाऊ शकेल.

एका शाहरुखच्या चाहत्यानं रियानचा फोनं नंबर मागितला आहे. जेणेकरुन तो त्याला 'पठाण' सिनेमा पाहता यावा यासाठी पैसे पाठवू शकेल. तर काही लोकांनी रियान हे सगळं नाटक करतोय असं देखील म्हणत त्याला खोटं ठरवलं आहे. तर काहींनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे.

'पठाण' २५ जानेवारीला रिलीज होत आहे आणि सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवशी 'पठाण' तगडी कमाई करेल असं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT