shah rukh khan host special welcome party for david beckham  SAKAL
मनोरंजन

David Beckham - SRK: फुटबॉलस्टार डेव्हिड बेकहम 'मन्नत'वर, शाहरुख खानने केलं कौतुक, म्हणाला...

डेव्हिड बेकहम आणि शाहरुख खान यांची भेट झाली

Devendra Jadhav

David Beckham - SRK News: फुटबॉलस्टार डेव्हिड बेकहम सध्या भारतात आहे. डेव्हिड भारत विरुद्ध न्युझीलंड सामना पाहायला वानखेडेवर उपस्थित होता. त्याने भारताला सपोर्ट केला. त्यानंतर डेव्हिडसाठी अभिनेत्री सोनम कपूरने खास पार्टीचं आयोजन केलं होतं.

या पार्टीला बॉलिवूड सुपरस्टार्स उपस्थित होते. काल रात्री डेव्हिड शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर भेट घेण्यासाठी गेला. आपापल्या क्षेत्रातील या दिग्गज व्यक्तींची भेट खास ठरली.

शाहरुख आणि डेव्हिड यांची भेट

शाहरुखने फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमच्या दयाळू स्वभावाचे कौतुक केले. याव्यतिरिक्त, बॉलीवूड अभिनेत्याने बेकहॅमला थोडा आराम करायला सांगितला.

शाहरुखने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन लिहीलंय की, "काल रात्री एका आयकॉन आणि एका परिपूर्ण व्यक्तीची भेट झाली. मी नेहमीच त्याचा खूप मोठा चाहता होतो.

शाहरुखने डेव्हिडच्या स्वभावाचं केलं कौतुक

शाहरुख पुढे लिहीतो, डेव्हिड बेकहमला भेटून मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं ते म्हणजे तो मुलांसोबत कसा वागतो.

हे पाहून मला जाणवलं की, फुटबॉलपेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे डेव्हिडचा दयाळूपणा आणि सौम्य स्वभाव. तू आणि तुझ्या कुटुंबावर माझे खुप प्रेम. असाच चांगला आणि आनंदी राहा माझ्या मित्रा. आणि थोडा आराम करा...''

सोनम कपूरची डेव्हिडसाठी खास वेलकम पार्टी

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रख्यात अभिनेते अनिल कपूर यांची लेक सोनम कपूरनं डेव्हिडसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते.

ते फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर आलेल्या कमेंट्स भन्नाट आहेत. सोनम कपूर आणि तिचे पती आनंद अहुजा यांनी या वेलकम पार्टीचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ठाकरेंचं चॅलेंज फडणवीसांनी स्वीकारलं; म्हणाले, एक लाख रुपये जिंकलो!

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे, दौड, काष्टी रुळाचे काम होणार; नागपूर-पुणे मार्गावरील गाड्या झाल्या रद्द..

Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांचा परदेशात डंका! नेदरलँड अन् जर्मनीसाठी पहिली ३० टनांची खेप रवाना

Chhatrapati Sambhajinagar News : शहर पर्यटन वाढीला आडकाठी! नियोजित पर्यटन धोरण वर्षभरापासून रखडले

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

SCROLL FOR NEXT