shah rukh khan jawan censor board certificate release date showtimings  SAKAL
मनोरंजन

Jawan: शाहरुख खानच्या 'जवान' वर सेन्सॉर बोर्डाने चालवली कैची! काय बदल केले अन् कोणतं सर्टिफिकेट मिळालंय बघा

Jawan Movie Marathi News: जवानला सुद्धा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीला सामोरं जावं लागत आहे

Devendra Jadhav

Jawan Shah Rukh Khan News: शाहरुख खानच्या जवान सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. पठाण नंतर यावर्षी शाहरुख खानच्या जवानची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपुर्वी जवानचा ट्रेलर रिलीज झाला आणि सोशल मिडीयावर एकच चर्चा झाली.

आता जवानला सुद्धा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीला सामोरं जावं लागत आहे. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार जवानला सेन्सॉरच्या कात्रीला सामोरं जावं लागलंय.

(shah rukh khan jawan censor board certificate)

शाहरुख खानच्या जवानला मिळालं हे प्रमाणपत्र

शाहरुख जवानला सेन्सॉर बोर्डाकडून UA प्रमाणपत्र मिळाले आहे. याचा अर्थ असा की, सर्व वयोगटातील लोकं हा चित्रपट पाहू शकतात. परंतु 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी हा चित्रपट पालकांच्या देखरेखीखाली पाहणे आवश्यक आहे.

याशिवाय जवानच्या 7 सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावण्याचा निर्णय घेतलाय. याआधी नुकताच रिलीज झालेल्या OMG 2 सिनेमावर सेन्सॉर बोर्डाने तब्बल २७ कट्स सुनावले होते.

जवान सिनेमाचा संपूर्ण रनटाईम

जवानची सिनेमाचा रनटाईम म्हणजेच सिनेमाची वेळ 169.18 मिनिटे आहे. एकुणच अडीच तासांचा हा सिनेमा आहे. जवानच्या सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेटची प्रत इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

या बदलांमध्ये चित्रपटातील काही संवाद आणि हिंसक दृश्यांचा समावेश आहे जे सुचविते की शाहरुख खान या चित्रपटाद्वारे धमाकेदार पुनरागमन करेल. आत्महत्येच्या दृश्यात बदल सुचवण्यात आले असून चित्रपटाचा रन टाईमही कमी करण्यात आला आहे.

जवानची रिलीज डेट

शाहरुख खानच्या जवान सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ७ सप्टेंबर रोजी शाहरुखचा जवान थिएटरमध्ये रिलिज होणार आहे.

जवान मध्ये शाहरुख सोबत साऊथ सुपरस्टार विजय सेतूपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सुद्धा जवानमध्ये झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Asia Cup साठी श्रेयस अय्यरला डावलल्यानंतर अजित आगरकरसोबतचे जुने मतभेद पुन्हा चर्चेत; वाचा सविस्तर

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT