Shah Rukh Khan Jawan film faces plagiarism allegation, Manickam Narayanan says story copied from Tamil film Perarasu sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: शाहरुख खानचा ‘जवान’ वादाच्या भोवऱ्यात, गुन्हा दाखल..

२०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाबाबत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश अडसूळ

shah rukh khan: शाहरुख वरील संकटाच सावट काही केल्या जाईना, अशी स्थिती आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून आता कुठे त्याला दिलासा मिळाला नाही तोवरच त्याच्यावर नवे संकट आले आहे. त्याच्या आगामी 'जवान' या चित्रपटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चित्रपटात आशयाची चोरी झाल्या प्रकरणी तमिळ निर्मात्याने गुन्हा देखील दाखल केला आहे.

(Shah Rukh Khan Jawan film faces plagiarism allegation, Manickam Narayanan says story copied from Tamil film Perarasu)

‘पठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ असे शाहरुखचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे. त्याच्या चित्रपट आहेत. त्याच्या 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच त्याच्या वाढदिवसादिवशी प्रदर्शित करण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची घोषणा झाली, शाहरुखच्या लुकची लोकांनी प्रशंसादेखील केली. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अटली कुमार ही दाक्षिणात्य दिग्दर्शक ‘जवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत आणि एका दक्षिणात्य चित्रपट निर्मात्यानेच ‘जवान’ या चित्रपटाविरुद्ध तक्रार केली आहे. निर्माते माणिकम नारायण असे त्यांचे नाव असून ‘तामिळनाडू फिल्म प्रॉड्युसर्स काउन्सिल’कडे त्यांनी तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटाची मूळ कथा तामिळ चित्रपट ‘पेरारसू’ची असून ती अटलींनी चोरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विजयकांत यांचा ‘पेरारसू’ हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेचे हक्क माणिकम नारायण यांच्याकडे आहेत.पण ‘जवान’ या चित्रपटाची कथा ‘पेरारसू’ सारखीच आहे असे माणिकम नारायण यांचे म्हणणे आहे. ‘पेरारसू’ या चित्रपटात विजयकांतने पेरारसू आणि इलवारसू अशी दुहेरी भूमिका साकारली होती. ‘जवान’ या चित्रपटातही शाहरुखचीही दुहेरी भूमिका असल्याची चर्चा आहे. या बाबत 'जवान'चे दिग्दर्शक अटली यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु ‘तामिळनाडू फिल्म प्रॉड्युसर्स काउन्सिल’ कडून ७ नोव्हेंबरनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

SCROLL FOR NEXT