shah rukh khan jawan movie release 7th sep runtime all you need to know SAKAL
मनोरंजन

Jawan Movie : ‘जवान’चे देशभरात पहाटे पाचपासून ‘शो’; जगभरात आज प्रदर्शित होणार

अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट आज (ता. ७) जगभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट आज (ता. ७) जगभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हिंदीबरोबरच तमीळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे देशभरात अनेक शहरांतील पहाटे पाच वाजल्यापासूनचे बहुतेक खेळ हाऊसफुल्ल झाले आहेत.

मल्टिप्लेक्सबरोबरच एक पडदा चित्रपटगृहांमध्ये बुकिंगची रेकॉर्डब्रेक नोंद झाली आहे. छोट्या सेंटरवरील तिकिटे संपूर्णतः विकली जात आहेत. हा चित्रपट मोठा इतिहास घडविणार असे तज्ज्ञांचे मत आहे.

जवान हा चित्रपट अॅटली यांनी दिग्दर्शित केला आहे. रेड चिलीज एंटरटेन्मेंटची ही प्रस्तुती आहे, गौरी खान या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर गौरव वर्मा सहनिर्माते आहेत. हाय-ऑक्टेन अॅक्शन सिक्वेन्स, एसआरकेचे आकर्षक विविध लुक्स आणि ट्रेलरमधील दमदार संवादांनी जवान चित्रपट हा अगोदरच चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ आणि ‘चलेया’ सारखी गाणी आधीच चार्टबस्टर ठरली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT