Jawan Video Esakal
मनोरंजन

Jawan Video: 'जवान' चित्रपटाचा सेटवरून व्हिडिओ लीक...शाहरुख खानचा मास लूक रिव्हिल

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान त्याच्या पठाणमुळं चर्चेत होता. त्यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केला. पठाण ने बॉक्स ऑफिसवर 1000कोटींचा टप्पा पार केला आहे. आता शाहरुखच्या आगामी जवाण या चित्रपटाकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. शाहरुखही त्याच्या जवान चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.

चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे. मात्र त्याआधीच जवान या चित्रपटाची दहा सेकंदांची व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर लीक झाली होती. व्हिडिओमध्ये शाहरुख खान स्टंट करताना दिसत आहे.

दहा सेकंदांच्या व्हिडिओमध्ये शाहरुख सिगारेट ओढताना आणि जबरदस्त फायटिंग सीन करतांना दिसत आहे. व्हिडिओतील शाहरुखचा हा स्टायलिश लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा या चित्रपटात अभिनेत्यासोबत दिसणार आहे.

या व्हिडिओमध्ये शाहरुख खान साऊथच्या चित्रपटांप्रमाणे मास लूकमध्ये दिसत आहे. त्याची अ‍ॅक्शनही तशीच आहे. तो ज्या पद्धतीने शत्रूंना हरवत आहे ते पाहून चाहते उत्साहित झाले. हा लूक पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करणे कठीण झाले आहे. थोड्यावेळातच हा लुक सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

2 जूनला रिलीज होणाऱ्या जवान या चित्रपटाची रिलीज डेट आता वाढवण्यात आली आहे. मात्र, जवानाची ही छोटी क्लिप शाहरुख खानच्या चाहत्यांना भेटच असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT