Jawan Movie
Jawan Movie Google
मनोरंजन

Jawan: शाहरुखच्या या सिनेमात स्टुडिओतलं शूटिंग नावालाच;प्रत्येक लोकेशन आहे रिअल, जाणून घ्या याविषयी सविस्तर

प्रणाली मोरे

Jawan Movie: शाहरुख खान,दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम अभिनित 'पठाण' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सलग तिसऱ्या आठवड्यातही आपला दबदबा कायम ठेवला आहे. हा सिनेमा शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी जणू जंगी मेजवानी आहे असं म्हणावं लागले.

आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ते किंग खानच्या 'जवान' सिनेमाची. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार शाहरुख खाननं 'जवान' सिनेमाचं १३० दिवसांचं पहिल्या शेड्युलमधलं शूटिंग पूर्ण केलं आहे. आणखी ३० दिवसाचं उरलेलं शूटिंग लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार,'पठाण' एक अॅक्शन सिनेमा होता..पण 'जवान'ची गोष्ट थोडी वेगळी आहे...त्याच्या गरजा थोड्या वेगळ्या होत्या..आहेत..त्यामुळे जवानचं जवळपास ९० टक्के शूट हे रिअल लोकेशनवर करण्यात आलंय..येतंय.

साऊथचा ब्लॉकबस्टर दिग्दर्शक एटलीनं अॅक्शन डायरेक्टर सुनिल रेड्रिग्स आणि एएनएल यांच्या सहाय्यानं सिनेमातील अॅक्शन सीन्स मोठ्या व्यापक स्तरावर शूट केलेयत. मोठ्या पडद्यावर ज्या आकर्षक गोष्टी पाहण्याची हौस प्रत्येक प्रेक्षकाला असते त्याहून अधिक मोठ्या स्तरावर काहीतरी लोकांना पहायला मिळेल आणि सिनेमाकडून त्यांची जी मागणी असते ती पूर्ण होईल असं देखील सूत्रांचे म्हणणे आहे.

'जवान' एकदम आपला सिनेमा लोकांना वाटेल आणि भरभरून त्यांचे मनोरंजन करेल असा विश्वासही त्या सूत्रानं व्यक्त केला आहे.

माहिती समोर येतेय की एटलीच्या जवानमध्ये अल्लू अर्जूनला कॅमियो साकारण्यासाठी अप्रोच केलं गेलं आहे. सूत्रानं खुलासा केला की,अल्लू अर्जूनचं सहा दिवसाचं शूटिंग शेड्युल आहे,ज्यात तो जबरदस्त अॅक्शन सीन्स शूट करणार आहे, यामध्ये त्याच्या सोबत सान्या मल्होत्रा देखील असेल.

या अॅक्शन थ्रीलर 'जवान' सिनेमाचं शूटिंग गेल्या वर्षी सुरू झालं. या सिनेमात शाहरुखचा डबल रोल पहायला मिळणार आहे. शाहरुखनं पुणे,मुंबई,हैदराबाद आणि चेन्नई मधील रिअल लोकेशनवर शूट केलं आहे.

याआधी पॅन इंडिया सिनेमाविषयी बोलताना शाहरुख म्हणाला होता, ''जवान सिनेमाची कहाणी कुठलीही भाषा आणि तिथल्या भौगोलिक क्षेत्रा पुरती मर्यादित नसून त्या पल्याड आनंद देणारी आहे. या वेगळ्या धाटणीच्या सिनेमाला बनवण्याचं श्रेय एटलीला द्यायला हवं. जो माझ्यासाठी खूप शानदार अनुभव राहिला कारण मला अॅक्शन सिनेने पसंत आहेत''.

बोललं जात आहे की जवान सिनेमा २ जून २०२३ रोजी रिलीज केला जाईल. शाहरुख खान व्यतिरिक्त सिनेमात विजय सेतुपति,नयनतारा,सान्या मल्होत्रा,सुनिल ग्रोव्हर असे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT