shah rukh khan jawan zinda banda song girija oak godbole dance with srk sanya malhotra priyamani atlee SAKAL
मनोरंजन

Zinda Banda Jawan: शाहरुखच्या जवानमध्ये मराठमोळ्या गिरीजा ओकचा जबरी डान्स! जिंदा बंदामध्ये चमकली

मराठमोळी गिरीजा ओक गोडबोले शाहरुख जवानच्या जिंदा - बंदा मध्ये चमकलीय

Devendra Jadhav

Zinda Banda Jawan Song: शाहरुख खानच्या जवान सिनेमाची उत्कंठा सध्या शिगेला आहे. शाहरुखच्या जवान मधलं पहिलं गाणं जिंदा - बंदा गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. शाहरुखचा रॉकींग अंदाज जवान मध्ये पहायला मिळतंय.

शाहरुखचं जिंदा - बंदा गाणं आज शुक्रवारी रिलीज झालंय. जवानमध्ये शाहरुख सळसळत्या एनर्जीने नाचलाय. जवान च्या गाण्यात शाहरुखच्या मागे हजारो मुली दिसत आहेत. यामध्येच मराठमोळी गिरीजा ओक गोडबोले झळकत आहे.

(shah rukh khan jawan zinda banda song girija oak godbole dance with srk)

शाहरुखसोबत नाचली मराठमोळी गिरीजा ओक गोडबोले

शाहरुखचं जिंदा - बंदा गाणं रिलीज झालंय. या गाण्यात शाहरुख विविध गेटअपमध्ये दिसतोय. शाहरुखची डान्स स्टेप, त्याचा डान्स अशा अनेक गोष्टींची चर्चा झालीय. अशातच जिंदा - बंदा गाण्यात मराठमोळी गिरीजा ओक गोडबोले शाहरुखच्या मागे नाचताना दिसतेय.

सर्वांना माहितच आहे की, गिरीजा ओक शाहरुखच्या जवान मध्ये झळकत आहे. जवानच्या प्रीव्ह्यु टीझरमध्ये गिरीजा झळकली होती. आता जवानच्या पहिल्या गाण्यात गिरीजा शाहरुखच्या मागे बिनधास्त नाचलीय.

जिंदा बंदा गाण्याचं वैशिष्ट्य काय?

जवानच्या जिंदा बंदा गाण्यात पहायला मिळतं की सुरुवातीला शाहरुख घोळक्यातुन त्याच्या खास स्टाईलने चालत येतो. त्याने लाल रंगाचं शर्ट आणि जिन्स पॅंट घातली असते.

आणि मग पुढे जिंदा बंदा गाण्याच्या खास स्टेपवर शाहरुख सळसळत्या एनर्जीने नाचताना दिसतो. शाहरुखच्या मागे अनेक डान्सर दिसत आहेत.

शाहरुख विविध गेटअपमध्ये दिसतोय. शाहरुख ज्या सफाईदारपणे नाचलाय त्याला तोड नाही. मध्येमध्ये शाहरुखचा पोलिस लुक सुद्धा पहायला मिळतोय. पण हा लुक संपुर्णपणे उघड झाला नाहीय.

जवानची रिलीज डेट

शाहरुखचा जवान हा चित्रपट हा रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रेझेंटेशन आहे. ज्याचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले असून गौरी खाननं निर्मात्या तर गौरव वर्मा सह-निर्मात्याच्या भूमिकेत आहे.

हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : पिकविमा जुलैमध्ये सुरू करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT