shah rukh khan Sakal
मनोरंजन

Jawan Movie: शाहरुखच्या मोस्ट अवेटेड 'जवान' चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे, आता या महिन्यात झळकणार चित्रपटगृहात

'जवान' चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jawan Movie: बॉलिवूडच्या बादशाहने चार वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर 'पठाण' चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आणि हा चित्रपट केवळ देशातच नव्हे तर परदेशातही मेगा ब्लॉक बस्टर ठरला.

त्याचवेळी चाहते आता किंग खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जूनमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या वर्षी शाहरुख खानचा दुसरा मोठा आगामी चित्रपट 'जवान' अॅटलीच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. असे वृत्त आहे की निर्माते आता चित्रपटाच्या रिलीजला उशीर करण्याचा विचार करत आहेत. मात्र, शाहरुख खान आणि अॅटली यांनी या अटकळांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

त्याच वेळी, ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांनी 'जवान' पुढे ढकलण्यात येत असल्याची पुष्टी केली. रमेश बाला यांनी असेही सांगितले की, टीम आता ऑक्टोबरमध्ये रिलीज करणार आहे. त्यांनी ट्विट केले, #SRK - दिग्दर्शक #Atlee चे #Jawan रिलीज जून ते ऑक्टोबर दरम्यान पुढे ढकलले जात आहे.

अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'जवान'चे शूटिंग गेल्या वर्षी सुरू झाले होते. या चित्रपटात शाहरुख खान डबल रोल करणार आहे. त्यांनी यापूर्वी पुणे, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई येथे काही भाग शूट केले आहेत.

या चित्रपटात शाहरुख खानशिवाय विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. थलपथी विजय चित्रपटात कॅमिओ करत असल्याच्याही अफवा आहेत.

'जवान' व्यतिरिक्त शाहरुख खान डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'डंकी' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू हिराणी यांनी केले असून तापसी पन्नूही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT