shahrukh Khan  Esakal
मनोरंजन

Shahrukh Khan:शाहरुखचीच हवा..जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत हॉलीवूडच्या हिरोंना सोडलं मागे

जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत भारतीय सेलिब्रिटी चौथ्या क्रमांकावर आहे.

Vaishali Patil

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या 'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण आता शाहरूखची सध्या हवा आहे असं म्हटलं तर खोटं नाही.

शाहरूख खानचा ट्रेलर रिलिज झाला, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत भारतीय सेलिब्रिटी चौथ्या क्रमांकावर आहे. तो सेलिब्रिटी आहे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान..

एकीकडे गेल्या महिन्यापासुन शाहरूख खानच्या पठाण चित्रपटातील गाणी रिलीज झाल्यापासून बॉयकॉट पठाण, बॉयकॉट शाहरूख असा ट्रेण्ड होत होता. इतकेच नव्हे तर तर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

पण शाहरूख खानला बॉलीवूडचा किंग खान का म्हणतात याच ताजं उदाहरण सध्या ट्विटवर व्हायरल होत असलेलं हे ट्विट...या व्हायरल ट्विटमध्ये आहे ज्यामध्ये जॉर्ज क्लूनी, जॅकी चॅन आणि टॉम क्रूझ यांना मागे टाकत शाहरुख खान जगातील श्रीमंत यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

जेरी सेनफेल्ड, टायलर पेरी, ड्वेन 'द रॉक' जॉन्सन, टॉम क्रूझ, जॅकी चॅन, जॉर्ज क्लूनी आणि रॉबर्ट डी नीरो यांच्यासोबत आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार, शाहरूख ची एकूण संपत्ती 770 दशलक्ष डॉलर्स आहे.

हे कळताचं शाहरुखच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तुफान हल्ला केला कारण ते शाहरूखाचं कौतुक करणे थांबवू शकत नाहीत. शाहरुख खान चार वर्षांनंतर पठाण, जवान आणि डंक या सिनेमांद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीत व्यस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT