SRK Pathaan 2 Updates esakal
मनोरंजन

Shah Rukh Pathaan 2 : शाहरुखचा 'पठाण 2' येतोय! निर्मात्यांकडून समोर आली मोठी अपडेट?

गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानच्या (Shah Rukh Pathaan 2 ) पठाण २ विषयी वेगवेगळ्या गोष्टींना उधाण आले होते.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Pathaan 2: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखनं पाच वर्षानंतर पठाणच्या निमित्तानं कमबॅक केलं होतं. आणि त्यात तो मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला होता. गेल्या वर्षी शाहरुखचे जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

या सगळ्यात पठाणचा २ येणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले असून त्याच्याबाबत एक मोठी अपडेटही समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर पठाणनं ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामध्ये पुन्हा एकदा शाहरुख वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शाहरुख, दीपिका अन् जॉन अब्राहमचा पठाण प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले होते. यशराज बॅनरच्या या चित्रपटाला वेगवेगळ्या कारणावरुन वाद झाला होता. यात दीपिकाची भगव्या रंगाची बिकीनी अन् शाहरुखच्या संवाद यामुळे तो काही अंशी ट्रोलही झाला होता. आता त्याच्या सिक्वेलची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

आता पठाण २ बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पिंकव्हिलानं दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खान आणि फिल्ममेकर आदित्य चोप्रा हे सध्या पठाण २ चा विचार करत आहेत. त्याच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. पठाण २ चे प्लॅनिंग पूर्ण असून या वर्षाच्या शेवटी त्याच्या शुटींगला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. पहिल्या भागानंतर त्याच्या सिक्वेलची चर्चा रंगली होती.

जर पठाणची २ ची निर्मिती झाली तर तो यशराज बॅनरचा आठवा स्पाय मुव्हीज असणार आहे. यापूर्वी आदित्य चोप्रा यांच्या पठाण विरुद्ध टायगर नावाच्या चित्रपटाची चर्चा आहे. त्याविषयीच्या वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या आहेत.

पठाण अन् गदरमध्ये झाली होती टक्कर....

शाहरुख खानचा पठाण बॉक्स ऑफिसवर तुफान लोकप्रिय झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. गेल्या वर्षी पठाण अन् गदर या दोन्ही चित्रपटांमध्ये कमाईच्याबाबत मोठी टक्कर दिसून आली. बॉलीवूड हंगामानं दिलेल्या नुसार पठाणनं भारतातून पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली तर जगभरातून हा आकडा हजार कोटींच्या पुढे होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसह उपनगरात मुसळधार! रस्त्यांवर पाणीच पाणी, लोकलसेवा विस्कळीत; घराबाहेर पडू नका, BMCचं आवाहन

Latest Marathi News Live Updates : पुण्यातील बाबा भिडे पूल 20 दिवसांसाठी खुला

C. P. Radhakrishnan VP Candidate : उपराष्ट्रपती पदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांचंच नाव का? यामागे भाजपची नेमकी रणनीती काय?

फक्त एक क्लिक...अन् फोनपासून बँक अकाउंटपर्यंत सगळं होईल हॅक, नव्या Captcha Scam चा हाहाकार, 'असं' रहा सुरक्षित

Asia Cup 2025: संजू सॅमसन, शुभमन गिल की यशस्वी जैस्वाल, टीम इंडियात कोणाला मिळणार संधी? अश्विन म्हणतो...

SCROLL FOR NEXT