Boycott Pathan esakal
मनोरंजन

Boycott Pathan: 'पिक्चर आला की, मंदिरात जातो, नाटकी XXX'!

बॉलीवूडमध्ये किंग खान शाहरुख हा त्याच्या हटकेपणासाठी ओळखला जातो.

सकाळ डिजिटल टीम

Shah rukh khan pathaan movie boycott trolled : बॉलीवूडमध्ये किंग खान शाहरुख हा त्याच्या हटकेपणासाठी ओळखला जातो. अनेकदा हा त्याचा हटकेपणा त्याच्या अंगाशी आल्याचे दिसून आले आहे. शाहरुखचा कोणताही नवा चित्रपट आला की त्याच्यावरुन वाद होतो हे चाहत्यांना नवीन नाही. शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट येतो आहे.

आमिरचा लाल सिंग चढ्ढा चित्रपट आला होता. त्यावेळी त्याच्या पूर्वीच्या मुलाखती व्हायरल झाल्या होत्या. आपल्याला आता या देशामध्ये काही राहायचे नाही. मी आणि माझी पत्नी किरण दुसऱ्या देशात जाण्याचा विचार करतो आहोत असे विधान आमिरनं केले होते. ते माझ्या पत्नीचे मत होते. मी त्यावर माझी प्रतिक्रिया दिली होती. मात्र नेटकऱ्यांनी आमिरचे ते बोलणे लक्षात ठेवले आणि त्याला चांगलाच धडा शिकवल्याचे दिसून आले आहे.

आमिरच्या त्या वक्तव्याचा परिणाम त्याच्या लाल सिंग चढ्ढावर झाला. त्याला प्रेक्षकांनी बॉयकॉट केले होते. आता शाहरुखला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. त्याचे झाले असे की. काही दिवसांपूर्वी शाहरुख हा मंदिरामध्ये गेला होता. नेटकऱ्यांना त्याचे मंदिरात जाणे काही पसंत पडले नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याचा संबंध हा त्याच्या आगामी पठाण नावाच्या चित्रपटाशी जोडला आहे. शाहरुखच्या पठाणवर बॉयकॉटची मागणी केली आहे.

दीपिका आणि शाहरुखवर चित्रित केलेले ते बेशरम गाणे जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा मात्र नेटकऱ्यांचा राग वाढलेला दिसला. काहींनी तर तिच्या बिकीनिच्या रंगाला देखील विरोध केला आहे. तिनं भगव्या रंगाची बिकिनी परिधान हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT