shah rukh khan, pathaan, deepika padukon SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan Pathaan: आणि शाहरुख पर्व सुरू.. पठाण च्या पहिल्याच शो ला तुफान गर्दी

अ‍ॅडव्हान्स बुकिंग करूनही या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Devendra Jadhav

पठाणबद्दल सध्या बरीच चर्चा आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग करूनही या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. रिलीजपूर्वीच पठाणने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 50 कोटी कमावले आहेत, त्यापैकी पहिल्या दिवशी 23 कोटी, दुसऱ्या दिवशी 13.3 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 13.9 कोटी कमावले आहेत. पठाण चा ठिकठिकाणी आज पहिला शो सुरु झालाय.. हाऊसफुल गर्दीत शाहरुखच्या पठाण ला प्रेक्षकांनी गर्दी केलीय

शाहरुख खान स्टारर 'पठाण' बॉक्स ऑफिसवर 45 ते 50 कोटी रुपयांची कमाई करू शकते आणि हा आकडा 60 कोटींपर्यंत पोहोचू शकतो असा विश्वास उद्योग तज्ञांना आहे. 2018 च्या "झिरो" नंतर शाहरुख खानचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. 

पठाण बॉयकॉट करण्यासाठी सोशल मीडियावर चळवळ सुरू होती. काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत चळवळ चालविली होती. त्यामुळे राजकीय पक्ष, संघटना, नेते यांच्यात त्यावर गरमागरम चर्चा होती. सिनेमाबाबत अनेक तक्रारी आल्याने सेन्सॉर बोर्डाने देखील पठाण मध्ये काही बदल सुचवले होते. त्यामुळे हा सिनेमा चालेल का? याविषयी अनेकांना साशंकता होती. पण सर्व विरोध मावळून पठाण पाहण्यासाठी आज सकाळपासून प्रेक्षकांनी थेटरबाहेर रांगा लावल्या आहेत

शाहरुखच्या फॅन्सनी आधीच तिकीट बुक करून लाडक्या किंग खानबद्दल प्रेम दर्शवलं आहे. शाहरुख खान फॅन्ससोबत सोशल मिडीयावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तो सध्या त्याच्या फॅन्सशी संवाद साधण्यासाठी ट्विटरवर #AsKSRK सेशन चालवत आहे. याच अंतर्गत शाहरुख त्याच्या फॅन्सनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर देत आहे.

पठाण सिनेमात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय डिंपल कपाडिया, आशुतोष राणा आणि गौतम रोडे देखील आहेत. पठाण मध्ये सलमान खान एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा २५ जानेवारीला रिलीजसाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT