Shah Rukh Khan rank Number 1 in Time100 Reader Poll esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : वाचकांची शाहरुख खानला सर्वोच्च पसंती

‘टाइम१०० रिडर पोल’मध्ये प्रथम क्रमांक; दिग्गजांना टाकले मागे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान हा टाइम१०० रीडर पोल’मध्ये सर्वोच्च स्थानी विराजमान झाला आहे. ऑस्कर पुरस्कार विजेता अभिनेता मिशेल योह, टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्स, ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग, ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुला डा सिल्वा यांना मागे सारून शाहरुखने बाजी मारली आहे.

‘टाइम’ मासिकाच्या सर्वांत प्रभावशाली लोकांच्या वार्षिक यादीसाठी समावेश करण्यासाठी जी व्यक्ती सर्वोत्कृष्ट वाटते तिला वाचकांनी मत द्यायचे, असा निकष या निवडीचा होता. त्यात शाहरुख खानने प्रथम क्रमांक पटकाविला. टाइम१०० रीडर पोल’साठी १२ लाख मतदान झाले. शाहरुख खानला त्यापैकी चार टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली.

विशेष म्हणजे या यादीत इस्लामी राजवटीत महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या इराणी महिलांनी दुसरे स्थान पटकाविले होते. २०२०मधील कोरोना साथीत रुग्णांची सेवा करणाऱ्या अमेरिकेतील आरोग्य सेवकांना वाचकांनी तिसऱ्या क्रमांक बहाल केला आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांना १.९ टक्के मते मिळाली आहेत. त्यांचे स्थान चौथे आहे.

‘टाइम’ची १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या नावाची यंदाची यादी या महिनाअखेरीस प्रसिद्ध होणार आहे. २०२२ मधील यादीत भारताच्या गौतम अदानी, करुणा नंदा आणि खुरर्म परवेझ यांचा यात समावेश होता.

यादीतील पहिली पाच नावे व त्यांना मिळालेली मतांची टक्केवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT