Shah Rukh Khan Latest News
Shah Rukh Khan Latest News Shah Rukh Khan Latest News
मनोरंजन

Shah Rukh Khan : शाहरुखने डॉन ३ नाकारला? शाहरुख स्क्रिप्ट निवडण्याची घाई करणार नाही

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan Latest News शाहरुख खानचा २०१८ मध्ये आलेला झिरो चित्रपट (Movie) फ्लॉप झाला. यानंतर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) चित्रपटांमधून ब्रेक घेतला आणि योग्य स्क्रिप्टची प्रतीक्षा केली. आता शाहरुख खानने ३ मोठे चित्रपट एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. हे त्याच्यासाठी योग्य कमबॅक ठरू शकते. मात्र, शाहरुख खानने डॉन ३ ला तूर्तास नाही म्हटल्याची माहिती आहे. ही माहिती खरी की खोटी हे येणार काळाच सांगेल.

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आदित्य चोप्राच्या प्रोडक्शनमध्ये बनत असलेल्या पठाण चित्रपटातून कमबॅक करणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय २२ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपट निर्माता राज कुमार हिरानी यांचा चित्रपट डंकी आणि २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणारा एटली यांचा चित्रपट (Movie) जवान या चित्रपटात शाहरुख न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. या तीन चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुखने पुढील चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स वाचण्यास सुरुवात केली आहे.

शाहरुख खान आता २०२४ च्या रिलीजसाठी तयारी करीत आहे. शाहरुखने त्याच्या ३ चित्रपटांचे शूटिंग जवळपास पूर्ण केले आहे. फक्त काही भाग शूट करणे बाकी असल्याने अभिनेत्याने पुढील चित्रपटाची तयारी देखील सुरू केली आहे. यावेळी शाहरुख स्क्रिप्ट निवडण्याची घाई करणार नाही. शाहरुख खानला डॉन ३ चित्रपट ऑफर केला होता. मात्र, त्याने नाही म्हटल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

डॉन ३ हा बहुप्रतिक्षित सिक्वेलपैकी एक आहे. चित्रपटाचे पहिले दोन भाग हिट ठरले होते. चाहत्यांना शाहरुखची भूमिका आवडली होती. ‘असे नाही की शाहरुख खानला स्क्रिप्ट आवडली नाही. शाहरुखला स्क्रिप्टबद्दल पूर्ण खात्री नव्हती. स्क्रिप्टबद्दल पूर्ण खात्री झाल्यावर तो मागे हटणार नाही. बॉक्स ऑफिसची परिस्थिती देखील सकारात्मक दिसत नाही. त्यामुळे चित्रपट साइन करण्यापूर्वी शाहरुखला दुप्पट खात्री करायची आहे, असेही सूत्राने सांगितले.

फरहान अख्तर ड्रॉईंग बोर्डवर गेला आहे. पुढच्या वेळी तो शाहरुख खानला भेटेल तेव्हा सुपरस्टार आनंदाने डॉन ३ साइन करेल. त्याचवेळी चाहत्यांनाही डॉन ३ बद्दल उत्सुकता असेल. चित्रपटाविषयीच्या अटकळांनी एवढी क्रेझ निर्माण केली, जेव्हा निर्माते डॉन ३ ची घोषणा करतील त्या दिवशी काय होईल, असेही सूत्राने म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT