shah rukh khan, pathaan, deepika padukon  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan Pathaan: शाहरुख दीपिकाला किस करणार? स्वतः शाहरुखनेच केला मोठा खुलासा

शाहरुखने दिलेला हा रिप्लाय सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतोय.

Devendra Jadhav

तो येतोय ४ वर्षांनी प्रमुख भूमिकेत. तो म्हणजे बादशाह शाहरुख खान. 'पठाण' च्या माध्यमातून शाहरुख खान ४ वर्षांनी प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शाहरुखचे फॅन्स या सिनेमासाठी खूप उत्सुक आहेत. शाहरुख सुद्धा सोशल मीडियावर सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अशातच एका फॅनने शाहरुखला वेगळाच प्रश्न विचारला. या प्रश्नावर शाहरुखने सुद्धा गमतीशीर उत्तर दिलं.

शाहरुखच्या एका फॅनने ट्विटर वर शाहरुखला प्रश्न विचारला. 'पठाण किसे किस करेगा?' असं एका फॅनने शाहरुखला विचारलं. यावर शाहरुखने या फॅनला दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालं. शाहरुख म्हणाला,"पठाण किस करने नहीं.. किक करने आया है.." अशा शब्दात शाहरुखने एकदम स्वॅग मध्ये त्याच्या फॅनला रिप्लाय केला. शाहरुखने दिलेला हा रिप्लाय सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतोय.

पठाण च्या रिलीजला आता काहीच दिवस उरले आहेत. पठाण ची रिलीजआधीच सगळ्या भारतात क्रेझ आहे. शाहरुखच्या फॅन्सनी आधीच तिकीट बुक करून लाडक्या किंग खानबद्दल प्रेम दर्शवलं आहे. शाहरुख खान फॅन्ससोबत सोशल मिडीयावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तो सध्या त्याच्या फॅन्सशी संवाद साधण्यासाठी ट्विटरवर #AsKSRK सेशन चालवत आहे. याच अंतर्गत शाहरुख त्याच्या फॅन्सनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर देत आहे

शाहरुख खानचा पठाण सिनेमा आधीपासून चर्चेत आहे. सिनेमातील बेशरम रंग गाण्यावरून सोशल मिडीयावर चांगलाच वाद रंगलेला. पठाण मध्ये शाहरुख खानचा फिटनेस, त्याची ऍक्शन याची सगळीकडे चर्चा आहे. शाहरुखचे फॅन्स ४ वर्षांनी त्यांच्या बादशाहला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आतुर आहेत.

पठाण सिनेमात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय डिंपल कपाडिया, आशुतोष राणा आणि गौतम रोडे देखील आहेत. पठाण मध्ये सलमान खान एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा २५ जानेवारीला रिलीजसाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT