मनोरंजन

ड्रग्जविषयी आर्यन कोडवर्डमधून बोलायचा, काय होता कोर्टातील युक्तिवाद

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला (Shah Rukh Khan) एनसीबीनं आज एनसीबी कोर्टामध्ये हजर केलं होतं.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला (Shah Rukh Khan) एनसीबीनं आज एनसीबी कोर्टामध्ये हजर केलं होतं. यावेळी वेगवेगळ्या गोष्टींवर धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्यन खानच्या वकिलांनी त्याला जामीन मिळावा म्हणून मागणी केली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या पुराव्यांमुळे त्याला न्यायालयानं जामीन नाकारला आहे. आता आर्यनला ७ ऑक्टोबरपर्यत एनसीबीच्या कोठडीत राहावं लागणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीनं आर्यनसाठी (Aryan Khan) नभ दिवसांची कस्टडी मागितली होती. तसेच आर्यननं त्याच्या टीम सोबत अंमली पदार्थांचे सेवन केल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे त्याला पुन्हा कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

एनसीबीनं कोर्टाला आर्यनच्या मोबाईलमधून जे चॅट सादर केलं त्यातून तो ड्र्ग्जची खरेदी आणि विक्री करण्यासंदर्भात काही डिलरशी बोलत असल्याचे दिसून आले आहे. त्याचे हे बोलणे कोड़ वर्डमध्ये असायचे. त्यामुळे या घटनेचे कनेक्शन परदेशातील काही जणांशी जोडले असावे असा संशय एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांनी आर्यन आणि त्याच्या सहकाऱ्यांकडे आणखी तपासासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे न्यायालयानं आरोपीला जामीन न देता त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी कोर्टाला आर्यनकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचे चॅटींगही सादर केले. त्यातून तो कोडवर्डचा वापर करत असल्याची माहिती समोर आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

एनसीबीनं सांगितलं की, आम्हाला याप्रकरणी आणखी तपास करायचा आहे. त्यासाठी नऊ दिवसांची रिमांड हवी आहे. त्यात आम्हाला आणखी काही जणांची चौकशी करता येईल. आर्यनच्या वतीनं सतीश मानशिंदे यांनी त्याचे वकीलपत्र घेतले आहे. त्यांनी सांगितलं की, आर्यननं कुठल्याही संघटनेशी बातचीत केली नाही. त्याच्याकडे ड्रग्ज सापडले नाहीत. त्याला त्या क्रुझवर बोलवण्यात आले होते. त्यामुळे यावरुन असे दिसुन येते की, तो त्या पार्टीमध्ये निमंत्रित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Washim News: सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची एन्ट्री;जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; दिग्गजांना हादरा

Latest Marathi News Live Update : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण; उद्या मुख्य यात्रा

Pimpri News: अपघात आणि बेपत्ता नोंद एकाच पोलीस ठाण्यात, तरी तपासाची तसदी घेतली नाही; CRPF जवानाच्या मृत्यूचा ५ दिवसांनी उलगडा..

Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

SCROLL FOR NEXT