Aryan Khan, Anannya Pande Video, Aryan Khan news, Aryan Khan viral video, Anannya Pande Video SAKAL
मनोरंजन

Aryan Khan - Anannya Pande Video: पप्पाच्या परीला मॅच कळेना! शाहरुखचा लेक समजवतोय अनन्याला मॅच.. मजेशीर व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओत IPL बघताना अनन्या गोंधळलेली दिसत असून आर्यन तिला समजावताना दिसतोय.

Devendra Jadhav

Aryan Khan - Anannya Pande Video News: सध्या सगळीकडे IPL चा हंगाम सुरु आहे. कोलकाता नाईट्स रायडरचा मालक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बऱ्याचदा स्टेडियमवर त्यांच्या टीमला सपोर्ट करताना दिसतो. अशातच IPL मॅच पाहायला आर्यन खान आणि अनन्या पांडे मैदानात पोहोचले. या दोघांचा एक व्हिडिओ चर्चेत आलाय. या व्हिडिओत IPL बघताना अनन्या गोंधळलेली दिसत असून आर्यन तिला समजावताना दिसतोय.

(Shah Rukh khan son aryan khan looks great while watching IPL match with Ananya pande)

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अनन्या पांडे ही अशी व्यक्ती आहे जी लहानपणापासून शाहरुखच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे आणि तिची सुहाना खानशी जुनी मैत्री आहे. सुहाना, अनन्या आणि शनाया कपूर यांनी त्यांचे बालपण एकत्र घालवले आहे आणि अशा परिस्थितीत तिघेही एकमेकांच्या कुटुंबाच्या खूप जवळचे मानले जातात. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यात आर्यन खानने अनन्याकडे दुर्लक्ष केल्याच्या व्हिडिओची बरीच चर्चा झाली होती..

हा व्हिडीओ एका IPL मॅचदरम्यानचा आहे, ज्यामध्ये दोघेही स्टेडियम मध्ये बसलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. अनेकदा अँग्री तरुणाचा लूक देणारा आर्यन या व्हिडिओमध्ये मस्त दिसत आहे. अनन्या मॅच बघताना काहीशी गोंधळलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न दिसत आहेत. आणि आर्यन काहीसा हसत तिला शांतपणे समजावताना दिसत आहे.

आता लोकांना काही जुने व्हिडिओ आठवत आहेत ज्यात आर्यन खानने अनन्याकडे वाईटरित्या दुर्लक्ष केले होते. खरं तर, ड्रग्ज प्रकरणानंतरचा हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा शाहरुखची मुलं अॅमेझॉन प्राइम सिनेमा 'माजा मा'च्या स्क्रिनिंगला पोहोचली होती. दरम्यान, आर्यन अनन्याशी न पाहता किंवा न बोलता समोरून निघून जात असल्याचे दिसले आणि हे पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटले. एकदा करण जोहरने त्याच्या शोमध्ये अनन्याला विचारले होते - तुमच्यापैकी कोणी वयाने वाढत असताना आर्यन खानवर क्रश नव्हता का? उत्तरात अनन्या म्हणाली होती- तो क्यूट आहे, हो माझा तो क्रश होता मग करणने विचारले- मग कथा पुढे तर गेली नाही ना? अनन्या म्हणाली - आर्यनला विचार. अशाप्रकारे बालपणीचे मित्र असलेले अनन्या आणि आर्यन एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT