Aryan Khan sakal
मनोरंजन

Aryan Khan : वेबसीरिजद्वारे आर्यन खान सिनेसृष्टीत

आर्यन खान सोशल मीडियावर चर्चेत आहे तो लवकरच अभिनय नव्हे, तर लेखक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे

सकाळ वृत्तसेवा

आर्यन खान : किंग खान शाहरूखच्या चाहत्यांचे जाळे जगभरात पसरलेले आहे. त्याच्या मुलाचीही तितकीच लोकप्रियता आहे. त्याचाही एक चाहतावर्ग आहे. सध्या आर्यन खान सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो लवकरच अभिनय नव्हे, तर लेखक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. तेही वेबसीरिजच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

२४ वर्षीय आर्यनने वेबसीरिजची कथा लिहिण्याचे काम नुकतेच पूर्ण केले आहे. आता त्याच्या वेबसीरिजसाठी कलाकारांचा शोध घेतला जात आहे. आर्यन ज्या वेबसीरिजवर काम करत आहे, त्याच्या लेखनाचे काम पूर्ण झाले आहे. कास्टिंगसाठी आर्यन स्वत: कलाकारांचे प्रोफाइल बघत आहे. आर्यन कलाकारांबाबत फारच सजग आहे.

त्याला वाटते की, वेबसीरिजमध्ये अशा कलाकारांची निवड व्हावी जे खरोखर त्या भूमिकेला शोभून दिसतील. त्यामुळे सीरिजचे लेखन पूर्ण झाल्यानंतर तो कलाकारांचा शोध घेत आहे. काही कलाकारांनी यासाठी ऑडिशनसुद्धा दिले आहे. त्यातील काही कलाकारांच्या नावाचा विचार केला जात आहे. तर काही शॉर्टलिस्ट आहेत. सर्व काही सुरळीत पार पडले तर या वर्षाच्या शेवटी सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT