Shah Rukh Khan Accident: Esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan Accident: अपघातनंतर शाहरुख खान आता कसा? पहिला व्हिडिओ आला समोर

Vaishali Patil

Shah Rukh Khan Accident: बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान हा सध्या खुप चर्चेत आहे. तो चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. दरम्यान बुधवारी त्याच्या आपघाताची बातमी समोर आली आणि चाहत्यांना धक्काच बसला.

शाहरुख खान चित्रपटाच्या एका शूटसाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिसला गेला होता, तिथे त्याचा अपघात झाला. यानंतर त्यांच्यावर तिथे शस्त्रक्रियाही करावी लागली. दुखापतीमुळे शाहरुखच्या नाकातून रक्त येऊ लागले, त्यानंतर त्याचे किरकोळ ऑपरेशन करावे लागले.

मात्र या बातमीने त्याचे चाहते काहीसे चिंतेत पडले होते. मात्र आता शाहरुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात शाहरुखची झलक पाहिल्यानंतर त्याचे चाहते आनंदित झाले आहेत. शाहरुखला बुधवारी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आणि विमानतळावरील फोटो मध्ये तो तंदुरुस्त आणि उत्तम दिसत होता. पापाराझींनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत.

या नव्या फोटो आणि व्हिडिओ सुपरस्टार किंग खान पूर्णपणे फिट दिसत आहे. मात्र त्याच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर कसल्याही जखमा दिसत नाही आहेत. त्याच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांना या फोटोंनी दिलासा दिला.

शाहरुख विमानतळावर त्याच्या नेहमीप्रमाणे कॅज्यूअल लूकमध्ये दिसत आहे. त्याने निळ्या रंगाच्या हूडेड स्वेटशर्टमध्ये आणि पांढरा टी-शर्ट आणि निळ्या डेनिम पॅंटसह, काळी टोपी आणि सनग्लासेस आणि स्टेटमेंट ब्रेसलेटसह लुक पुर्ण केला होता . यात तो नेहमीप्रमाणे कुल लूकमध्ये दिसला.

यावेळी किंग खान एकटाच नव्हता तर सोबत त्याची पत्नी गौरी खान आणि त्याचा लहान मुलगा अबराम खान त्याच्यासोबत होते. शाहरुखचा जेव्हा अपघात झाला. त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली. तेव्हा गौरी त्याच्यासोबत होती.

सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचे चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट यावर्षी 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT