shah rukh khan srk birthday celebration outside mannat bandra SAKAL
मनोरंजन

SRK Birthday Celebration: फटाके, केक अन् तो..! मन्नतबाहेर शाहरुखच्या वाढदिवसाचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

आज शाहरुख खानचा वाढदिवस. रात्री १२ वाजताच शाहरुखच्या घराबाहेर वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं

Devendra Jadhav

SRK Birthday Celebration News: आज शाहरुख खानचा वाढदिवस. जगभरातले तमाम फॅन्स लाडक्या किंग खानला शुभेच्छा देण्यासाठी सज्ज आहेत. शाहरुख खान सुद्धा त्याच्या फॅन्सच्या प्रेमाचा स्वीकार करत आहे.

शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. रात्री १२ वाजता शाहरुखच्या घराबाहेर म्हणजेच मन्नतबाहेर शाहरुखने खास अंदाजात फॅन्सना भेटून वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलंय.

(shah rukh khan srk birthday celebration outside mannat bandra)

शाहरुखच्या वाढदिवसाला दिवाळीचा माहोल

शाहरुख खानच्या वाढदिवसाला काल संध्याकाळपासुनच त्याचं घर मन्नतबाहेर गर्दी जमली होती. शाहरुखचे फॅन्स देशाच्या विविध भागातुन मन्नतबाहेर गर्दी करत होते.

अनेकांच्या हातात केक्स होते. आणि मग १२ चा टोला पडला. सर्वांच्या लाडक्या शाहरुख खानच्या वाढदिवसाची सुरुवात फटाके फोडून करण्यात आली. आकाशात फटाक्यांची आतषबाजी सजली. जणु काही दिवाळीचा माहोल तयार झाला होता.

आणि तो आला...!

१२ वाजुन गेले होते. सर्वांना उत्सुकता होती ती म्हणजे त्यांचा लाडका किंग खान कधी येणार. आणि तो आला. मन्नतच्या गॅलरीबाहेर शाहरुख आला आणि फॅन्सने एकच जल्लोष केला.

शाहरुखने ब्लॅक टीशर्ट, डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा अशा खास अंदाजात मन्नतबाहेर आला होता. त्याने नेहमीप्रमाणे सर्वांना अभिवादन केलं. शाहरुखला पाहताच मन्नतबाहेर एकच जल्लोष झाला. शाहरुखने सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार केला.

शाहरुखच्या वाढदिवसाला डंकीची भेट

शाहरुख खानच्या 'डिंकी' चित्रपटाचा टिझर आज त्याच्या वाढदिवशी रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, 'डंकी'चा टिझर शाहरुख खानच्या वाढदिवसाला म्हणजेच 2 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. शाहरुख काही निवडक चाहत्यांसह चित्रपटाचा टीझर लाईव्ह पाहणार असल्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT