Pathaan Sakal
मनोरंजन

Pathaan: बजेटच्या वर कमाई करताच शाहरुख देणार गूडन्यूज 'पठाण'ची तिकिटे होऊ शकतात स्वस्त!

हा चित्रपट केवळ देशातच नाही तर परदेशातही नवे रेकॉर्ड बनवत आहे आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान स्टारर 'पठाण' हा चित्रपट मेगा ब्लॉक बस्टर ठरला आहे. हा चित्रपट केवळ देशातच नाही तर परदेशातही नवे रेकॉर्ड बनवत आहे आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. स्टारकास्ट आणि निर्माते देखील चित्रपटाच्या सुपर यशाने खूश आहेत. या सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे पठाण चित्रपटाचा तिकीट दर कमी होऊ शकते.

वृत्तानुसार, शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या तिकिटांच्या किमती जवळपास 25 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक अंक तयार केल्यानंतर, निर्मात्यांना वेग कायम ठेवायचा आहे. कारण यामुळे दर्शकांची संख्या वाढेल. स्पाय-अॅक्शन थ्रिलरने यापूर्वीच जागतिक स्तरावर 500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात या चित्रपटाने जवळपास 300 कोटींचा व्यवसाय केला आहे.

एका मल्टिप्लेक्स आणि दोन सिंगल-स्क्रीन थिएटर्सचे मालक अनिल चंचलानी म्हणाले की पठाणच्या तिकिटांच्या किमती सर्वत्र एकसारख्या नसतील, असे मिड-डेने वृत्त दिले. ते म्हणाले, "क्षेत्रानुसार ते 10 ते 30 टक्के असू शकते."

जयपूर बेस्ड एग्जीबिटर अभिमन्यू बन्सल यांनी सांगितले की, आठवड्याच्या दिवशी कमी लोकसंख्येला तोंड देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तो म्हणाला, "वीकेंडमध्ये किमती पुन्हा किंचित वाढू शकतात. आदित्य चोप्रा प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये आणण्यात यशस्वी ठरला आहे."

सोमवारी, मीडिया आणि फॅन मीटिंग दरम्यान, शाहरुख खानने खुलासा केला की चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी आणि कॅमेऱ्याला सामोरे जाण्यासाठी तो घाबरला होता. इतकं प्रेम दाखवल्याबद्दल आणि सर्व अडचणी असूनही रिलीजला पाठिंबा दिल्याबद्दल अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांचे आणि माध्यमांचे आभार मानले.

त्याच वेळी, आपण थोडा अहंकारी असल्याचेही त्याने उघड केले. यादरम्यान शाहरुखने दीपिका पदुकोणसाठी एक गाणेही गायले आणि अभिनेत्याने जॉन अब्राहमला किस केले.

लवकरच शाहरुख खान नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्यासोबत एटलीच्या 'जवान'मधून पॅन इंडियामध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्याकडे तापसी पन्नूसोबत राजकुमार हिरानीचा 'डंकी'ही आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानचे हे मोस्ट अवेटेड सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT