Shah Rukh Khan Suhana First Film Sujoy Ghosh Director 
मनोरंजन

Shah Rukh Suhana Khan : बापलेक दिसणार एकाच चित्रपटात, शाहरुख अन् सुहाना च्या चित्रपटाची घोषणा, सुजाय घोष करणार दिग्दर्शन

पठाण आणि जवानच्या दिमाखदार यशानंतर किंग खान शाहरुख हा आता प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकीमध्ये दिसणार आहे.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Suhana First Film Sujoy Ghosh Director : पठाण आणि जवानच्या दिमाखदार यशानंतर किंग खान शाहरुख हा आता प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकीमध्ये दिसणार आहे. अशातच त्याच्या लेकीच्या डेब्यूची चर्चा रंगली आहे. ती दिग्दर्शक झोया अख्तरच्या द आर्चिचमधून डेब्यू करणार असून शाहरुखबरोबर देखील चमकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

यंदाचे वर्ष किंग खानसाठी खूपच लाभदायी ठरले आहे. त्याच्या पठाणनं बॉक्स ऑफिसवर हजार कोटींची कमाई केली होती. त्यानंतर जवाननं देखील आठशे कोटींपेक्षा अधिक कमाई करुन नवा विक्रम आपल्या नावावर केला होता. या सगळ्यात शाहरुखच्या लेकीच्या पदार्पणाची चर्चा रंगली आहे. शाहरुख आणि सुहाना हे दोघेजण एकाच चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे बोलले जात आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सुजाय घोष करणार आहेत.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

शाहरुखचा डंकी हा २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. त्याचे कारण शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानीच्या चित्रपटात दिसणार आहे. त्यानं यापूर्वी तीनवेळा हिरानी यांच्या प्रोजेक्टला नाही म्हटले होते. त्यामुळे डंकीची चाहत्यांना उत्सुकता आहे. दुसरीकडे सुहानाचा द आर्चिच नावाचा चित्रपट येत्या ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख अन् सुहानाच्या फिल्मचे शुटींग लवकरच सुरु होणार आहे. अद्याप या फिल्मविषयी अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आली नसून शाहरुख आणि सुहाना यात दिसणार असल्याचे वृत्त जागरणनं दिलं आहे. पहिल्यांदा या चित्रपटाचे शुटिंग हे सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र या सगळ्यात शाहरुख आणि सुहाना पहिल्यांदाच एकत्रितपणे स्क्रिन शेयर करणार असल्यानं त्याची उत्सुकता अधिक आहे.

यावर्षी शाहरुखचा तिसरा चित्रपट डंकी हा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतरही पुढील वर्षी शाहरुखकडे अनेक मोठे प्रोजेक्टमध्ये आहे. डंकीचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून त्यामध्ये विकी कौशल, तापसी पन्नु यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT