Shah Rukh Khan take legal action against krk.pathaan controversy Google
मनोरंजन

KRK On Pathaan: शाहरुखला नडला..गेमच झाला..

काही दिवसांपूर्वी 'पठाण' मधील 'बेशरम रंग' गाण्याविरोधात टीका केल्याप्रकरणी शाहरुख खाननं केआरके विरोधात केस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रणाली मोरे

KRK On Pathaan: कमाल आर खान उर्फ केआरके पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडणार आहे. काही महिने आधीच जेलमधून जामीनावर केआरके बाहेर आला आहे. त्याच्यावर सलमान खाननं केस केली होती आणि आता शाहरुख खान त्या तयारीत आहे. केआरके नं 'बेशरम रंग' गाणं आणि त्यातील दीपिकाच्या कपड्यांवरनं,डान्सवरनं तिच्यावर खूप सडकून टीका केली होती. त्यामुळे आता शाहरुखनं त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. (Shah Rukh Khan take legal action against krk.pathaan controversy)

कमाल आर खान हा सगळ्याच सिनेमांवर,बॉलीवूडच्या कलाकरांवर नेहमी टीका करताना दिसतो. तो अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यातही नाक खुपसतो. आणि अनेकदा गोत्यात सापडतो. शाहरुख खानच्या पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यावरनं गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलेलं होतं. त्यातही स्वतःला समिक्षक म्हणवणाऱ्या केआरकेनं उडी घेतली होती. त्यानेच ट्वीट करत आता लिहिलं आहे की शाहरुख त्याच्या विरोधात यासाठी कायदेशीर कारवाई करणार आहे.

केआरकेनं ट्वीट करत लिहिलं आहे की-''माझ्या कानावर बातमी पडली आहे की शाहरुख खान माझ्याविरोधात कायदेशीर कारवाईच्या तयारीत आहे. कारण बेशरम रंग गाण्यात दीपिकानं अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी मी थेट बोललो होतो. खरं बोललो होतो. तुम्ही माझा त्या गाण्यावरील रिव्ह्यू पाहू शकता आणि मी काही चुकीचं बोललो आहे का ते पहा''. याव्यतिरिक्त केआरकेनं आणखी एक ट्वीट केलं आहे.

केआरके नं दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की-''जर शाहरुख खानला वाटतं की फक्त माझ्या रिव्ह्यूने त्याचा पठाण सिनेमा फ्लॉप होईल तर हा त्याचा समज चुकीचा आहे. त्याचा सिनेमा या तीन कारणांनी फ्लॉप होईल. पहीलं तर सिनेमाचं चुकीचं नाव,दुसरं सिनेमाचं कथानक-अॅक्शन,आणि तिसरं कारण लोकांच्याच बॉयकॉटमुळे. जर मला शाहरुख या सिनेमाचा रीव्ह्यू करायला नकार देईल तर मी करणार नाही''.

थोडक्यात माहितीसाठी सांगतो की,याआधी सलमान खानने केआरकेवर मानहानीचा खटला दाखल केला होता,जेव्हा त्यानं 'राधे' या सलमानच्या सिनेमाचा रिव्ह्यू केला होता. आता शाहरुख त्याच्या विरोधात कारवाई करणार आहे..यात नवल वाटण्यासारखं काही नाही. याआधी मनोज बाजपेयीला केआरकेनं 'चरसी' म्हटलं होतं. तेव्हा मनोज बाजपेयीनं त्याच्यावर मानहानीची केस दाखल केली होती. जेव्हा ही मनोज बाजपेयीची याचिका रद्द करावी अशी मागणी याचिकेद्वारे केआरकेनं केली होती तेव्हा मध्यप्रदेश हायकोर्टानं केआरकेची याचिकाच रद्द केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT