Shah Rukh Khan Teases Mumbai Police Commissioner, Reveals Who His 'Real Boss' Is Google
मनोरंजन

'मुंबईचे पोलिस आयुक्तही झुकतात',शाहरुखच्या विधानानं सोशल मीडियावर खळबळ

शाहरुख खाननं भर कार्यक्रमात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांची खिल्ली उडवलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Shah Rukh Khan: बॉलीवूडच्या किंग खाननं नुकताच 'उमंग २०२२' (Umang 2022) कार्यक्रमात सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम मुंबई पोलिसांसाठी दरवर्षी आयोजित केला जातो,ज्यामध्ये टी.व्ही आणि बॉलीवूड इंडस्ट्रीचे बरेच सेलिब्रिटी कार्यक्रमात सहभागी होतात आणि एकापेक्षा एक धमाल परफॉर्मन्स देतात. 'उमंग २०२२' चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरुख खान मुबंईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांची खिल्ली उडवताना दिसत आहे.(Shah Rukh Khan Teases Mumbai Police Commissioner, Reveals Who His 'Real Boss' Is)

शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात उमंग २०२२ च्या मंचावर तो आणि कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया दिसत आहेत. हर्ष मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे(Sanjay pandey) यांचा उल्लेख करताना म्हणतो की संपूर्ण मुबंई पोलिस त्यांचा शब्द खाली पडू देत नाही. यावर शाहरुख खान मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या जबाबदारीविषयी भाष्य करतो. त्यानंतर तो मंचासमोरच बसलेल्या संजय पांडे यांची खिल्ली उडवत म्हणतो की भले मुंबई पोलिस त्यांचे ऐकते पण ते सुद्धा एका व्यक्तीसमोर 'येस बॉस' असं म्हणतात. खरंतर,शाहरुखचा ईशारा संजय पांडेंच्या पत्नीच्या दिशेने होता. पण याचे वेगळेच अर्थ काढत व्हिडीओ जोरदार व्हायरल करण्यात आला.

शाहरुखच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो २०२३ मध्ये 'पठाण' सिनेमातून आपल्या भेटीस येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सिद्धार्थ आनंद आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. हा सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. त्याचबरोबर नयनतारासोबत एटलीच्या 'जवान' सिनेमातही शाहरुख दिसणार आहे. हा सिनेमा २ जून,२०२३ रोजी रिलीज होणार आहे. सध्या शाहरुख 'डंकी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. २०१८ मध्ये शाहरुख शेवटचा 'जीरो' सिनेमात अनुष्का शर्मा,कतरिना कैफ सोबत दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT