Shahrukh Khan Google
मनोरंजन

SRK+(OTT) शाहरुखचं गुपित उत्साहाच्या भरात सलमाननं ट्वीटरवर केलं उघड

किंग खान डिजिटल विश्वात पदार्पण करत असल्याची माहिती त्यानं ट्वीट करुन चाहत्यांना दिली होती.

प्रणाली मोरे

शाहरुख खान(Shahrukh Khan)चे चाहते नेहमीच त्याच्या कोणत्या ना कोणत्या नवीन घोषणेची वाट पाहतच असतात. आर्यन खान प्रकरणात बाप म्हणून हतबल झालेला शाहरुख जेव्हा सोशल मीडियावरनं गायब झाला तेव्हा देखील त्याच्या चाहत्यांना हुरहूर लागून राहिली होती. पण त्याचं सोशल मीडियावरचं कमबॅक त्याच्या चाहत्यांनी दणक्यात साजरं केलं. 'पठाण' सिनेमाच्य अनाऊन्समेंटचं औचित्य साधत शाहरुखनं आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावर संवाद साधला होता. आता पुन्हा शाहरुख त्याच्या एका नव्या घोषणेमुळे चर्चेत आला आहे. त्याची ही घोषणा ऐकून त्याच्या चाहत्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

शाहरुखनं एक मोठी घोषणा केली आहे. शाहरुखनं ट्वीटरवर आपल्या ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं आहे की,'' तो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आपल्या भेटीस येत आहे''. त्यानं साधारण त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय की,''ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता काहीतरी नवीन घडणार आहे''. शाहरुखने आपला ट्वीटसोबत एक फोटो देखील शेअर केला आहे. फोटो मध्ये शाहरुखने थम्स अप करतानाची पोझ दिली आहे. त्यानं लिहिलंय,''एस आर के प्लस''.

आता शाहरुखच्या या पोस्टवरुनं तरी दिसतंय की शाहरुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणतातरी नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहे. कदाचित तो प्रोजेक्ट म्हणजे शाहरुखचा नवा सिनेमा,शो किंवा वेबसिरीज असू शकते. आता पुढील शाहरुखच्या घोषणेनंतर नक्की कळेल काय आहे ते. शाहरुखच्या या घोषणेनंतर सलमाननं त्याचं अभिनंदन करणारे एक ट्वीट केले आहे. आणि लिहिलंय,''आज की पार्टी तेरी तरफ से. खूप अभिनंदन शाहरुख तुझं आणि ओटीटी वरील तुझ्या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा''. पण हे लिहिताना सलमान एक चूक करून बसला आहे. त्यानं त्याच्या पोस्टमध्ये शाहरुखचं अभिनंदन करताना लिहिलंय,''तुझ्या नवीन ओटीटी अॅपसाठी शुभेच्छा''. आता शाहरुखनं जे नंतर सांगायला लपवून ठेवलं होतं त्याचा सलमाननं फियास्को केला ना राव.

शाहरुख सध्या स्पेनमध्ये 'पठाण' सिनेमाचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे. त्याच्यासोबत तिथे सिनेमातील दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम हे कलाकार देखील शूट करीत आहेत. २०१८ मध्ये 'झीरो' फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर 'पठाण' घेऊन येतोय. पठाण सिनेमाकडून शाहरुखच्या चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यात आता शाहरुख नवीन काय करतोय याकडे देखील आता चाहते डोळे लावून बसतील यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT