shah rukh khan Tributes to Martyrs of 26/11 Attacks Esakal
मनोरंजन

Srk : 26/11 हल्ल्यातील शहिदांना 'किंग खान'ची आदरांजली; कुटुंबियांना मिठी मारून केलं सांत्वन

गेटवे ऑफ इंडियाला आयोजित एका कार्यक्रमात शाहरुख सहभागी झाला होता

Devendra Jadhav

काल २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या सन्मानार्थ गेटवे ऑफ इंडियामध्ये खास कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्यात बॉलिवूड इंडस्ट्रीमधले अनेक सेलिब्रिटी सहभागी होते.

२६/११ च्या हल्ल्याला १४ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शहीदांच्या सन्मानार्थ खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शाहरुखने शहीदांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे शहीद जवानांच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस, शरद केळकर, शिव ठाकरे सहभागी होते

गेटवे ऑफ इंडियाला आयोजित कार्यक्रमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिला.

शाहरुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, तो व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्याच्या मॅनेजर आणि सुरक्षा रक्षकासह येथे पोहोचला होता.

दरम्यान किंग खानने तेथील अनेक महिलांना हात जोडून अभिवादन केले आणि त्यांच्याशी बोलताना दिसला. याशिवाय शहीद कुटुंबाला मिठी मारुन त्याने पाठबळ दिले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. किंग खानचा हा हावभाव चाहत्यांना खूप आवडला आहे.

शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट डंकीमुळे चर्चेत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father Kills Son : सांगलीत मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने घातला दगड; सततच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य, कासेगाव पोलिसांत गुन्‍हा

Hingoli News: तहानलेल्या वानरांसाठी पाण्याची सोय; हयातनगर येथील शेतकरी विजय पाटील यांचा पुढाकार

Beed News: पोस्ट ऑफिस आहे की जनरल स्टोअर?; पत्रे दुकानात अन् कर्मचारी सुस्त; नागरिक संतप्त, सेवेेचा लाभ मिळणार तरी कसा?

Beed News: ‘सीतेच्या न्हाणी’चे वैभव पडले अडगळीत; विकासाचा वनवास; किल्ले धारूरच्या ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था वाढली

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT