Shahrukh Khan Trolled  Sakal
मनोरंजन

Shahrukh Khan Trolled: "अरे तुला काही लाज...", जवान सुपरहिट झाला पण शाहरुख का होतोय ट्रोल?

Vaishali Patil

Shahrukh Khan Trolled: बॉलिवूड चित्रपट 'जवान'ची सध्या सर्वत्र आहे. थिएटर्सपासून बॉक्स ऑफिसपर्यंत शाहरुख खानचा जवान चित्रपट धुमाकूळ घालत आहे. 'जवान'ने रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांतच भरघोस कमाई करत नवा रोकॉर्ड केला आहे. या चित्रपटाने दोन दिवसाताच 100 कोटींच्यावर कमाई केली आहे. या चित्रपटाची शाहरुखच्या चाहत्यांपासून तर बॉलिवूड अन् टॉलिवूड कलाकारांपर्यंत क्रेझ आहे.

शाहरुखचे चाहते या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी रिलिज झाल्यापासूनच या चित्रपटासाठी उत्सूक होते. हा चित्रपट फर्स्ट डे पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. तर दुसरीकडे त्यांनी थिएटरबाहेर ढोल ताशे वाजवले आणि फटाके फोडले.

या चित्रपटातील शाहरुखची भुमिका प्रेक्षकांना खुपच आवडली. सोशल मीडियावर तर फक्त शाहरुखचीच चर्चा आहे. या चित्रपटाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

त्यातच जवानचं सेलिब्रेशन करणाऱ्या चाहत्यांच्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सगळ्यात सध्या अहमदाबादमध्ये शाहरुखच्या फॅन ग्रुपने त्याच्या 'जवान' चित्रपटाच्या पोस्टरवर दूग्धाभिषेक केला आणि शाहरुखप्रती त्यांचे प्रेम व्यक्त केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की त्यानंतर शाहरुख खानने देखील यावर प्रतिक्रिया दिली.

ट्विटरवर शाहरुख खानने अहमदाबादमधील एका चाहत्यांच्या ग्रुपने प्रतिक्रिया दिली. या हृदयस्पर्शी कृतीने किंग खान खूप भारावला होता. त्या ग्रूपचं कौतुक करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही.

या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, "सर्व गोष्टींसाठी अहमदाबादचे आभार. विशेष म्हणजे त्या दूधासाठी..वाह !!! तुम्ही लोक नाचा, जल्लोष करा आणि आनंदी रहा. तुमचे प्रेम आणि शुभेच्छा मला मनापासून आपेलशा वाटतात."

या ट्विटनंतर त्याचे चाहते तर खुप खुश झाले मात्र काही नेटकऱ्यांना हे मुळिच आवडलं नाही. नेटकरी दुधाची अशी नासाडी पाहून शाहरुखवर टीका करत आहेत.

शाहरुखसारख्या सुपरस्टारने दुधाची नासाडी करणाऱ्या चाहत्यांना थांबवायला हवं होतं मात्र उलट तो त्यांचे कौतुक करत आहे. असं म्हणत अनेकांनी त्याला ट्रोल केलं.

यासोबत सोशल मीडियावर आणखी एक चर्चा आहे. असा दावा केला जात आहे की शाहरुख खानचे प्रोडक्शन हाऊस जाणूनबुजून अशा लोकांपर्यंत पोहोचत आहे ज्यांनी त्याच्या नवीन चित्रपट 'जवान'बद्दल नकारात्मक लिहिले होते.

त्यांनी चित्रपटाचा नकारात्मक कमेंट्स काढून टाकल्याबद्दल त्यांना मोठं गिफ्ट देण्याचं आश्वासनही दिलं जात आहे. तसे काही स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यात किती सत्यता आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

मात्र शाहरुखच्या जवान चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद हा अधिकच वाढत चालला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT