shah rukh khan video viral that fan click his photo and video outside clinic  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: फॅन गुपचुप काढत होता व्हिडीओ! शाहरुखने केलं असं काही की.. चर्चांना उधाण

शाहरुख खानचा एक लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Shah Rukh Khan News: शाहरुख खानने २०२३ वर्षी तीन सिनेमांच्या माध्यमातून सर्वांच्या हृदयावर राज्य केलं. शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

झालं असं की... शाहरुख खान त्याच्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असतो. पण कधी त्याचा मूड वेगळा असेल तर तो फॅन्सवर रागावतानाही दिसतो. व्हायरल झालेल्या नवीन व्हिडीओमध्ये असंच काहीसं दिसतंय.

शाहरुखचा व्हिडिओ व्हायरल

शाहरुख त्याची मॅनेजर पूजासोबत त्याच्या कारकडे जात होता. शाहरुखने हुडी घेऊन स्वतःचा चेहरा झाकला होता.

अनेकजण शाहरुखला त्याच्या कॅमेरात कैद करत होते. शाहरुखने तेव्हा एका फॅनच्या फोनवर मारल्याची चर्चा आहे. पुढे शाहरुख न थांबता थेट गाडीजवळ जाऊन बसला. आता शाहरुखच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा होतेय.

२०२३ मध्ये शाहरुखचे 3 चित्रपट झाले रिलीज

शाहरुखच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी त्याचे 3 सिनेमे रिलीज झाले होते. तब्बल 4 वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर परतला. त्याचे 'जवान' आणि 'पठाण' हे दोन चित्रपट खूप गाजले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय केला. डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'डंकी' या तिसऱ्या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

शाहरुखचे आगामी चित्रपट

शाहरुख आता नव्या चित्रपटात काम करणार आहे. तो म्हणाला होता की, तो एक चित्रपट करणार आहे ज्यामध्ये तो खऱ्या वयाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात शाहरुखने वक्तव्य केलं की, "मी मार्च किंवा एप्रिलमध्ये नवीन चित्रपटात काम करेन. मी असा चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामध्ये मी माझ्या खऱ्या वयाचा आहे आणि तरीही चित्रपटाचा हिरो आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Politics: जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप! उमर अब्दुल्लांची खुर्ची धोक्यात? नॅशनल कॉन्फरन्समध्ये काय घडतय

Sanjay Gupta Passed Away: शूटआउट अ‍ॅट वडाळा फेम दिग्दर्शक संजय गुप्ता यांचं निधन, वयाच्या ५९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Global Warming: जागतिक तापमानवाढीचा वेग दुप्पट; पृथ्वीच्या तापमानात दशकात 0.35 अंशांनी वाढ

Geetanjali Chavan Success Story : सिंधुदुर्गची कन्या चमकली! वडिलांचं छत्र हरपलं, पण जिद्द नाही सोडली; गीतांजलीची सुरक्षा दलात निवड, वाचा प्रेरणादायी कहाणी

Marathi News Live Updates : नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती, पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजपचे आत्मपरीक्षण

SCROLL FOR NEXT