Shah Rukh Khan and Kapil Sharma  Sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: शाहरुख खान आणि कपिल शर्मामध्ये बिनसलं? म्हणूनच...

यावेळी शाहरुख खान द कपिल शर्मा शोमध्ये पठाण या चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही. याचा खुलासा खुद्द किंग खानने सोशल मीडियावर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये दर आठवड्याला कलाकार आणि देशातील अनेक बड्या व्यक्ती हजेरी लावतात. हे कलाकार द कपिल शर्मा शोच्या टीमसोबत खूप विनोद करतात. अनेकवेळा हे सिनेस्टार त्यांच्या चित्रपटांचे जोरदार प्रमोशनही करतात. मात्र यावेळी शाहरुख खान द कपिल शर्मा शोमध्ये पठाण या चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही. याचा खुलासा खुद्द किंग खानने सोशल मीडियावर केला आहे.

शाहरुख खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तो अनेकदा त्याच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरवर #AsKSRK सेशन चालवतो. या सेशनमध्ये चाहत्यांनी शाहरुख खानला अनेक प्रश्नही विचारले. आता एका चाहत्याने किंग खानला विचारले आहे की तो यावेळी द कपिल शर्मा शोमध्ये दिसणार की नाही? चाहत्याने आपल्या कमेंटमध्ये लिहिले, सर कपिल शर्मा शोमध्ये येणार आहात का? चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख खान म्हणाला की तो कपिल शर्मा शोमध्ये जाणार नाही.

किंग खानने त्याच्या उत्तरात लिहिले की, 'भाई, मी थेट चित्रपटगृहात येईन, तिथे भेटू'. पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकताच पठाण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्यामध्ये शाहरुख खानची जबरदस्त अॅक्शन स्टाइल पाहायला मिळाली.

या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्याचवेळी डिंपल कपाडिया, आशुतोष राणा आणि गौतम रोडे देखील आहेत. पठाण या चित्रपटात सलमान खान एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: कोल्हापूर ब्रेकिंग : मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, तिघे जखमी

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT