Shah Rukh Khansurprise 'Ask SRK' session:  Esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: "माझीच बायको मला...", शाहरुखचं चाहत्यांसोबत #AskSRK सेशन! प्रश्नाचे दिले भन्नाट उत्तर...

शाहरुखने काल त्याच्या चाहत्यांसबोत ट्विटर हँडलवर #AskSRK सत्राचे आयोजन केले होते.

Vaishali Patil

Shah Rukh Khansurprise 'Ask SRK' session: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. किंग खानचे चाहते 'जवान'ची आतुरतेने वाट पाहत आहे. काल या चित्रपटातील आणखी एका गाण्याचा टिझर रिलिज करण्यात आला आहे.

त्याचबरोबर स्वत: शाहरुखदेखील या सिनेमाचे अपडेट चाहत्यांसोबत शेयर करत आहे. साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. आता शाहरुखसह चित्रपटाची टिमदेखील प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.

त्यासाठीच शाहरुखने काल त्याच्या चाहत्यांसबोत ट्विटर हँडलवर #AskSRK सत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनीही त्याला खुप सारे प्रश्न विचारले आणि शाहरुखनेही सर्वांच्याच प्रश्नाची उत्तर दिली.

या सेशनदरम्यान एका चाहत्याने शाहरुख खानला जवानाची भारतातअॅडवान्स बुकिंग सुरू करण्यास सांगितले, त्यावर उत्तर देतांना शाहरुख म्हणाला की, "करेल भावा सगळ्यांचा पगार तर होऊ दे "

एकानं विचारलं की जर 'जवान' चा ट्रेलर चांगला नसेल तर चित्रपट बघू की नको? यावर किंग खानने ट्रोल करणाऱ्यांना सांगितल, "भावा जरा सकारात्मक राहायचं शिक"

याच सेशल दरम्यान एका चाहत्यांने शाहरुखला सांगितलं की, "त्याची बायको नेहमी सिनेमा पहायला जातांना लेट करते, तिने पठाण चित्रपटावेळीही असाच उशीर केला होता, त्यामुळे जवान चित्रपटाच्यावेळी तसं होऊ नये यासाठी काहीतरी टिप्स द्या", त्यावर शाहरुखनं खुपच मजेशीर उत्तर दिलं.

यानप्रश्नावर उत्तर देतांना शाहरुख म्हणाला, "ओके आता यापुढे बायकोबाबतच्या समस्या सांगू नका प्लिज..मी माझीच सांभाळू शकत नाही, त्यात तुम्ही तुमच्या समस्याही माझ्यावर सोपवतात. सर्व महिलांनी विना तणाव ‘जवान’ चित्रपट पाहण्यासाठी जा.”

तर एकानं सलमानच्या बाल्ड लूकबद्दलही शाहरुखला प्रश्न विचारला. जवानाच्या प्रमोशनसाठी सलमान खानचा नवा लूक आहे का...? यावर किंग खान म्हणाला की, "सलमानला माझ्यावरच प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही लूक करण्याची गरज नाही. तो मनापासून माझ्यावर प्रेम करतो."

एका चाहत्यानं विचारलं की, सर टक्कल करुन जवान पहायला जायचं का? त्यावर शाहरुख म्हणाला की, "फक्त अंघोळ करुन जा. चित्रपटात लूक आवजला तर टक्कल कर..."

किंग खानने #AskSRK सत्रादरम्यान 'नॉट रमैय्या वस्तावैया' या नवीन गाण्याचा टीझर देखील रिलीज केला. या गाण्यात शाहरुख खान खूपच डॅशिंग लूकमध्ये दिसत होता. रेड चिलीज बॅनरखाली बनलेला 'जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT